kill कंटाळा  : आपल्याला  बोअर  होऊच  शकत  नाही , एवढं  भारी  काम करणार  का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 03:46 PM2020-03-28T15:46:08+5:302020-03-28T15:50:49+5:30

घरच्या  घरी  भन्नाट  फोटोफ्रेम  येते  का  करता ?

getting bored at Home? try this unique photo frame! | kill कंटाळा  : आपल्याला  बोअर  होऊच  शकत  नाही , एवढं  भारी  काम करणार  का ?

kill कंटाळा  : आपल्याला  बोअर  होऊच  शकत  नाही , एवढं  भारी  काम करणार  का ?

googlenewsNext

कोलाज फ्रेम गरम गरम उन्हाच्या दुपारी करायची मज्ज

साहित्य: एक पांढरं कार्डशीट किंवा घरात असलेला पुठ्ठय़ाचा तुकडा, रंग, डिंक, कात्री

कृती:

1) तुमच्या घरी रोज वर्तमानपत्र येतं. दुस:या दिवशी घरातले मोठे त्या दिवशीचं ताजं घेऊन बसतात आणि जुनं रद्दीत ठेवतात. आता एक काम करा, रोज रद्दीतून ते वर्तमानपत्र घ्यायचं, सोबत येणा:या पुरवण्या घ्यायच्या.

2) सगळं मस्त जमिनीवर बसून एकदा चाळायचं.

3) त्यातल्या इंटरेस्टिंग गोष्टी वाचून काढायच्या, एखादा फोटो आवडला तर तर कापून ठेवायचा. एखादी जाहिरात, एखादं काटरून, एखादं चिन्ह, अक्षरं. जे जे म्हणून तुम्हाला आवडेल ते कापून घ्या.

4) कापलेल्या गोष्टी एखाद्या फोल्डरमध्ये किंवा पिशवीत नीट ठेवा.

5) आठवडा भरानंतर एखाद्या दुपारी, खूप गरम होत असेल आणि घरातली मोठी माणसं डुलक्या घेत असतील त्यावेळी कापलेले सगळे तुकडे, कार्डशीट किंवा पुठ्ठा घेऊन बसा. आणि कापलेल्या तुकडय़ांपासून एखादं मस्त कोलाज बनवा.

6) कापलेली चित्र, चिन्ह, अक्षर लावताना तुम्ही क्रिएटिव्हिटी फुल ऑन करून टाका.

7) फोटोंच्या मध्ये मध्ये जागा सोडायला विसरू नका. म्हणजे मग सगळं चिकट काम संपल्यावर तुम्हाला तिथे मस्त रंग भरता येतील.

8) तुमच्याकडे जुना गिफ्ट रॅपिंग पेपर, रिबिनी, छोटी खोटी फुलं असं जे जे काही तुम्ही जपून ठेवलेलं असेल तेही सगळं सोबत घ्या आणि कोलाज करताना त्याचाही वापर करा.

 9) सगळ्यात शेवटी  तुमचं कोलाज तर तुम्हाला भिंतीवर टांगायचं असेल तर कोलाजच्या वरच्या बाजूला दोन्ही कडेला छोटी भोकं पाडा त्यातून दोरा ओवा आणि कोलाजला लटकविण्याची सोय करा.

 

Web Title: getting bored at Home? try this unique photo frame!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.