English Vinglish : झटक्यात इंग्रजी शिकायचं का ? मग फटक्यात try this
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 18:51 IST2020-04-01T18:49:25+5:302020-04-01T18:51:20+5:30
हा खेळ खेळण्यात मस्त वेळ तर जाईलच, शिवाय नवनवे शब्दही समजतील. तर चला, करूया सुरू..

English Vinglish : झटक्यात इंग्रजी शिकायचं का ? मग फटक्यात try this
आनंद निकेतन शाळा , नाशिक
एरवी इंग्रजी म्हणजे मोठा शत्रूच जसा काय तुमचा ! पण ठरवलं तर इंग्रजीशी दोस्ती करणं काही फार मोठं कठीण नाही.
इथे रोज नवा खेळ सुचवायचं ठरवलंय आम्ही. तुम्ही घरात दोन मुलं असा, नाहीतर चार-सहा; हा खेळ खेळण्यात मस्त वेळ तर जाईलच, शिवाय नवनवे शब्दही समजतील. तर चला, करूया सुरू..
काय करायचं?
1. कुठलाही एक विषय निवडायचा, ज्याच्याशी संबंधित
खूपसे शब्द असतील. म्हणजे जसं फुड.
2. ठरलेल्या विषयाशी संबंधित एक शब्द एकाने
सांगायचा; पण तो शब्द इंग्रजी असला पाहिजे.
3. लगेच पुढच्याने दुसरा शब्द सांगायचा.
4. एका गडय़ाला जास्तीत जास्त वेळ 30 सेकंद
एवढाच! तेवढय़ा वेळात जर नवा शब्द आठवला नाही,
तर तो/ती बाद!