एव्हरेस्टवर जायची रेस आहे, घेणार का भाग ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 22:59 IST2020-04-09T22:58:52+5:302020-04-09T22:59:34+5:30
द रेस फॉर एव्हरेस्ट चला, आज दुपारी सगळे झोपले, की आपण जाऊया एवरेस्टवर!

एव्हरेस्टवर जायची रेस आहे, घेणार का भाग ?
ट्रेकिंग आवडतं? किती जण सह्याद्रीमधले डोंगर, कडे चढला आहात? तुम्हाला ट्रेकिंग आवडत असेल किंवा नसेल पण ज्यांनी एव्हरेस्ट सर केला त्या सर एडमंड हिलरी आणि तेनङिांग नोर्गे शेर्पा यांच्या एव्हरेस्ट चढाईची गोष्ट तुम्हाला बघायला मिळाली तर?
आज आपण वरचेवर ऐकतो की एव्हरेस्टवर ट्रेकर्सची गर्दी झाली आहे, एव्हरेस्टवर प्रचंड कचरा आहे, प्रदूषण आहे. पण या दोघांनी एव्हरेस्ट सर केला तेव्हा त्यांच्याआधी या जगातल्या सगळ्यात उंच शिखरावर कुणीही गेलेलं
नव्हतं. त्यांच्या प्रवासाची गोष्ट सांगणारी डॉक्युमेंट्री बीबीसी या जगप्रसिद्ध संस्थेने केलेली आहे. जी युट्युबवर बघता येऊ शकते.
या डॉक्युमेंट्रीचं नाव आहे द रेस फॉर एव्हरेस्ट.
डॉक्युमेंट्री काय असते?
डॉक्युमेंट्री म्हणजे माहिती पट. यातही आपल्या सिनेमासारखीच गोष्ट असते पण खरीखुरी गोष्ट असते. रचलेली, काल्पनिक गोष्ट नसते. प्रत्यक्ष त्याठिकाणी जाऊन शूटिंग केलेलं असतं, त्या घटनेचे फोटो आणि त्याच्याशी संबंधित व्यक्तींकडून माहिती घेऊन माहितीपट बनवला जातो. ब?्याचदा यात एक नरेटर असतो. म्हणजे माहिती सांगत नेणारा सूत्रधार.
तर एव्हरेस्टच्या गोष्ट सांगणारा हा माहितीपट नक्की बघा. एक दुपार मस्त घालवा.