हे पहा 'असं ' बनवा तुमच्यासाठी खास ब्रेसलेट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 22:03 IST2020-04-09T22:01:49+5:302020-04-09T22:03:56+5:30
ब्रेसलेट्स मुलींबरोबर मुलं पण घालतातच की हल्ली!

हे पहा 'असं ' बनवा तुमच्यासाठी खास ब्रेसलेट !
रात बसून बसून कितीही कंटाळा आला तरी आपल्याला घराबाहेर पडताच येणार नाहीये, मग काय करता येईल बरं? शिवाय बाजारातून काही विकतही आणता येणार नाहीये. पण हरकत नाहीये. आपल्या घरातही अनेक गोष्टी असतात. ज्या वापरून आपण मस्त गोष्टी बनवू शकतो.
तुम्हाला ब्रेसलेट्स आवडतात का?
बरं ब्रेसलेट्स फक्त मुलींसाठीच असतात असं अजिबात नाहीये. मुलंही हल्ली ब्रेसलेट्स घालतात. घरच्या घरीही तुम्ही मस्त ब्रेसलेट्स बनवू शकता. तेवढाच टाईमपास.
साहित्य :
रंगीत कागद, कात्री, निमुळता ग्लास, डिंक, सेलो टेप किंवा तुमच्यकडे असेल तर कलर्ड डक टेप, वायर
कृती :
1) तुमच्या मनगटाच्या आकाराची वायर कापून घ्या.
2) वायरची दोन्ही टोकं सेलो टेप किंवा डिंकाने नीट जोडून गोल बनवून घ्या.
3) या गोलाभोवती सेलोटेप फिरवा.
4) त्याच्या चिकट बाजूला रंगीत पेपर चिकटवा.
5) आता बाजूला डिंक लावून रंगीत कागद चिकटवा.
6) तुमच्याकडे डबल टेप असेल तर तीही तुम्ही वापरू शकता.
7) अशाच पद्धतीने तुम्ही बांगडी किंवा जाड ब्रेसलेटही बनवू शकता.
8) एक सेंटिमीटरच्या अंतरावर तीन वायर्सचे गोल ठेवा आणि तिघांना मिळून डक टेप/ सेलो टेप/ डबल टेप फिरवा.
9) हे फिरवताना तिघांना मिळून गुंडाळत टेप न्या.
10) डक टेप नसेल वर सांगितलं तसाच कागद चिकटवा. आणि हातात घालून मस्त मिरवा.