थर्मास - तुम्हाला घरच्या घरीसुध्दा बनवता येऊ शकेल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 17:33 IST2020-06-10T17:24:51+5:302020-06-10T17:33:52+5:30
घराला बनवा तुमची प्रयोगशाळा

थर्मास - तुम्हाला घरच्या घरीसुध्दा बनवता येऊ शकेल!
साहित्य:
प्लॅस्टिकची उभी बाटली, ब्लेड सरबताची धातूची बाटली, थमोर्कोलचे छोटे गोळे. पारदर्शक चिकटपट्टी, फेविकॉल, चकचकतीत कागद.
कृती :
1. एक धातूची सरबताची बाटली घ्या. या बाटलीपेक्षा थोडी मोठ्या आकाराची मोठ्या तोंडाची प्लॅस्टिकची बाटली घ्या.
2. प्लॅस्टिक बाटलीचे झाकण काढा. या बाटलीला तोंडाच्या समोरासमोरच्या बाजूंना सुमारे तीन सेंटीमीटर उंचीच्या चिरा द्या. त्या फाकवून धातूची बाटली आत बसवा.
3. या दोन बाटल्यांच्या मधल्या भागात थमोर्कोलचे छोटे गोळे भरा. अधून मधून थोडे थोडे फेविकॉल टाकत रहा.
4. दोन बाटल्यांमधली पोकळी जास्तीत जास्त गच्च भरा. त्यानंतर बाहेरच्या बाटलीला सर्व बाजूंनी चिकटपट्टी गुंडाळा.
5. त्याच्यावर चकचकीत कागद गुंडाळा. त्यावर पुन्हा चिकटपट्टी गुंडाळा. हा झाला थर्माॅस तयार.
प्लॅस्टिक, थमोर्कोल आणि फेविकॉल यांचा थर उष्णतेचे वहन जलद करत नाही. त्यामुळे आतल्या धातूच्या बाटलीतील पदार्थाचे तापमान बराच काळ स्थिर राहाते.