कुणाला सिक्रेट पत्र लिहायचं आहे ? मग घरीच बनवा अदृश्य शाई ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 12:46 IST2020-06-03T12:44:09+5:302020-06-03T12:46:00+5:30

टॉप सिक्रेट

DIY - how to make iviseibel ink- science experimetn at home | कुणाला सिक्रेट पत्र लिहायचं आहे ? मग घरीच बनवा अदृश्य शाई ! 

कुणाला सिक्रेट पत्र लिहायचं आहे ? मग घरीच बनवा अदृश्य शाई ! 

ठळक मुद्देदुपारी सगळे झोपल्यावर करायचे धमाल उद्योग


तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींना काही खास आणि गुप्त संदेश पाठवायचा असेल तर अदृश्य शाईचा वापर तुम्ही करू शकता. तुम्हाला खरं वाटत नाहीये? शाई अदृश्य कशी होऊ शकते असा प्रश्न पडलाय? पण खरंच शाई अदृश्य करता येऊ शकते. 
कशी ? वाचा. 
साहित्य:  
अर्ध लिंबू, चमचा, वाटी, कॉटन बड (कान साफ करायला वापरले जाणारे), पांढरा कागद, पणती किंवा दिवा. 
कृती: 
1) अर्ध लिंबू वाटीत पिळा. त्यात किंचित पाणी म्हणजे अगदी काही थेंब पाणी टाका. 
2) चमच्याने लिंबाचा रस आणि पाण्याचे थेंब व्यवस्थित एकत्र करा. 
3) कॉटन बड या मिश्रणात बुडवा आणि त्याने पांढ?्या कागदावर तुमचा मेसेज लिहा. 
4) हे मिश्रण पूर्ण वाळेस्तोवर थांबा. वाळल्यावर अक्षर संपूर्ण अदृश्य होऊ द्या. 
5) तुमचा गुप्त संदेश लिहून तयार आहे. पण समोरच्या तुमच्या दोस्ताने तो वाचायचा कसा?


6) जेव्हा तुम्हाला किंवा तुमच्या दोस्ताला हा गुप्त संदेश वाचायचा असेल कागद बल्बच्या समोर किंवा पणतीच्या जवळ धरा. कागद धरताना तो पेट घेणार नाही याची काळजी घ्या. 
7) गरम बल्ब किंवा पणती मुळे लिंबाच्या रसातले घटक ब्राऊन होतात आणि कागदावर अक्षरं उमटू लागतात. 
 

Web Title: DIY - how to make iviseibel ink- science experimetn at home