शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

coronavirus : हा कोरोना मरत का नाही ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2020 3:11 PM

श्वेताला प्रश्न पडला आहे, की अख्खं जग या कोरोनाच्या तावडीतून कधी सुटणार?

ठळक मुद्देहा कोरोना व्हायरस कधी संपणार?

- श्वेता देशमुख

तुम्हाला माहीत आहे का मुलांनो, कोरोना हा काही नवा व्हायरस नाहीये. माणसाला या व्हायरसची माहिती 1960 सालापासून आहे. कोरोना व्हायरस हा शब्द लॅटिन शब्द कोरोनावरून घेतलेला आहे. कोरोनाचा लॅटिन अर्थ क्राउन किंवा मुकुट. या व्हायरसला सगळीकडे मुकुटाला असतात तशी टोकं असतात. हा व्हायरस प्राण्यांमधून माणसांमध्ये शिरतो. सध्या ज्या व्हायरसने धुमाकूळ घातला आहे आणि तुम्हाला घरात अडकवून ठेवलं आहे तो व्हायरस या मूळ कोरोनाचंच नवं रूप आहे. म्हणून डब्ल्यूएचओने या नव्या स्वरूपातल्या कोरोनाला कोविड 19 म्हटलं आहे.

हा व्हायरस जाणार कधी?कोरोना 1960 पासून माणसाला माहीत आहे. म्हणजे 1960 पूर्वीही तो होता आणि यानंतरही तो असेल. त्यामुळे या व्हायरसला पूर्णपणे नष्ट करता येऊ शकत नाही. पण शास्रज्ञ आणि या विषयातले तज्ज्ञ यावर लस शोधत आहेत. त्याच्या चाचण्याही सुरू झाल्या आहेत. त्यामुळे लवकरच याची लास उपलब्ध होईल आणि त्यापासून माण्सांना आपलं संरक्षण करता येईल.

तोवर काय?तोवर आपण स्वच्छता पाळायची. हात स्वच्छ साबणाने धुवायचे. जोवर आपण लॉकडाउनमध्ये आहोत तोवर बाहेर पडण्यासाठी हट्ट करायचा नाही.बाहेर का पडायचं नाही? हा व्हायरस नुसता स्पर्शानेही पसरतो. त्यामुळे तो आपल्यार्पयत कसा आणि कुठून पोहोचेल सांगता येत नाही. दुसरं म्हणजे हा व्हायरस गुणाकाराच्या स्वरूपात पसरतो. त्यामुळे झटपट वाढतो. त्याच्या वाढण्याचे प्रमाण रोखायचं असेल तर माणसांनी एकमेकांच्या कमीतकमी संपर्कात यायला हवं. त्याच्या वाढण्याची साखळीच आपल्याला तोडून टाकायची आहे. ती एकदा का तुटली की ह्या आजारावर आपण मात करू, हे युद्ध जिंकू आणि सगळ्यांना परत खेळायला बाहेर जाता येईल. त्यामुळे ही व्हायरसची साखळी तोडायला आईबाबांना, सरकारला तुम्ही छोटे दोस्तही नक्की मदत करा.