बच्चा समझते हो क्या ? कागदावर कोणी रंगपंचमी खेळतं का ? - खोटं वाटतं , try this ..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 16:23 IST2020-03-27T16:21:22+5:302020-03-27T16:23:32+5:30
घरबसल्या रंगपंचंमी खेळण्याची सुपर से उपर शक्कल

बच्चा समझते हो क्या ? कागदावर कोणी रंगपंचमी खेळतं का ? - खोटं वाटतं , try this ..
रंगांचा खेळ खेळायचा ? त्यासाठी घराबाहेर जाण्याची काय गरज? यंदा कोरोनामुळे आई-बाबांनी रंगही नीट खेळू दिला नाही ना, हरकत नाही. आता तुम्ही पेपरवर तुमच्या आवडत्या रंगांची उधळण करा.
साहित्य : तुमचे आवडते रंग, वेगवेगळ्या साइझचे ब्रश, जुना टूथब्रश, पाणी, ब्रश पुसायला रुमाल, एक पांढरा कार्डशीट वेगवेगळे आकाराचे. हे आकार भूमितीचे असू शकतात किंवा प्राण्यापक्ष्यांचे. तुम्हाला हवे ते आकार घ्या.
कृती :
1) पांढ:या कार्डशीटवर आकार नीट रचून ठेवा.
2) आता जुना टूथब्रश पाण्यात बुडवून मग तुम्हाला हव्या त्या रंगात बुडवा.
3) पेपरच्या जवळ न्या. आणि दुस:या हाताने ब्रशवर सपकन अंगठा फिरवा.
4) कागदावर तुषार उडतील. तेही रंगीत.
5) टूथब्रश स्वच्छ करून आता वेगळ्या रंगात बुडवा आणि परत तसंच करा.
6) जितक्या म्हणून कॉम्बिनेशनचे रंग तुम्हाला उडवत राहायचं आहे मस्त उडवा.
7) मग ब्रश घ्या. तोही रंगात बुडवा आणि मग कागदावर झटका. असं वेगवेगळ्या रंगांनी करा.
8) हे सगळं करत असताना आपले आकार मूळ कार्डशीटवरून हलणार नाहीत याची काळजी घ्या.
9) सगळे रंग स्प्रे करून झाले आणि वाळले की हळूच आकार काढून घ्या आणि गंमत बघा. रंगीबेरंगी शिंतोडय़ात तुमचे आकार मस्त उठून दिसतील.
10) आवडत असेल तर या आकारांनी डार्क बॉर्डर करा. झाली की नाही मस्त रंगपंचमी.