ब्रॅण्डन स्मिथला भूगोल हा विषय खूप आवडतो. कारण भूगोलात नकाशे असतात. आणिं ब्रॅण्डनला नकाशे वाचायला खूप आवडतात. ब्रॅण्डन दरवर्षी त्याचा वाढदिवस त्याच्या बाबा बरोबर एखाद्या अॅडव्हेंचर ट्रिपला जाऊन किंवा हॉटसन किंवा टेक्सासमधील एखाद्या अम्यूजमेण्ट पार्कमधे जाऊन करतो. पण कोरोनामुळे यंदा त्याला त्याचा वाढदिवस घरातच साजरा करावा लागणार होता. पण घरात राहूनही आपल्या मुलाचा वाढदिवस विशेष व्हायला हवा, त्याला मजा यायला हवी यासाठी त्याच्या ब्रॅण्डनच्या वडिलांनी ्ट्विटरवर एक पोस्ट टाकली. त्या पोस्टमधे लिहिलं की माझा मुलगा ब्रॅण्डन स्मिथचा पुढच्या आठवडय़ात वाढदिवस आहे. यंदा कोरोनामुळे तो घरातच करावा लागणार आहे. माङया मुलाला नकाशा वाचन करायला खूप आवडतं. तुम्ही त्याला शुभेच्छा दिल्या तर तुमचं ठिकाण तो नकाशावर नक्की नोंदवेल. आणि या आवाहानासोबत हातात जगाचा नकाशा धरलेला ब्रॅण्डनचा फोटो टाकला. त्याच्या वडिलांना वाटलं आपल्या या आवाहानाला अमेरिका किंवा कॅनडातून पाच पन्नास मेसेजेस येतील. पण घडलं वेगळंच ट्विटरवरचा हा मेसेज खूपच व्हायरल झाला.
जगभरातून लोकांनी ब्रॅण्डनला शुभेच्छा पाठवल्या.. का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 16:01 IST
ब्रॅण्डनच्या वाढदिवसाची गोष्ट
जगभरातून लोकांनी ब्रॅण्डनला शुभेच्छा पाठवल्या.. का?
ठळक मुद्देट्विटरवरचा हा मेसेज खूपच व्हायरल झाला.