स्वत:ला दोन पायावर ओढत नेणारी मगरीची चाल कशी चालाल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 04:15 PM2020-06-10T16:15:58+5:302020-06-10T16:17:08+5:30

अॅलिगेटर ड्रॅग.

alligator drag -exercise at home | स्वत:ला दोन पायावर ओढत नेणारी मगरीची चाल कशी चालाल?

स्वत:ला दोन पायावर ओढत नेणारी मगरीची चाल कशी चालाल?

googlenewsNext
ठळक मुद्देकराल मग हा व्यायाम?

तुम्ही सुसर, मगर पाहिली आहे? दोन्ही एकाच कुळातल्या. 
मागे एकदा मी एक मगर पाहिली होती. खाडीजवळ. काठावर. पाण्यात एकदम स्वस्थ बसलेली. एवढीश्शीही हालचाल नाही. पाण्यात जणू काही एखादा दगड पडला आहे! काही वेळानं हरणांचा एक कळप तिथे दबकत दबकत आला. ते तर किती भित्रे भागुबाई असतात, तुम्हाला माहीत आहे. त्यांना पाणी प्यायचं होतं. काही वेळ ते घुटमळले. चारही दिशांचा अंदाज घेतला. काहीच धोका नाही, हे कळल्यावर त्यातल्या एका हरणानं हळूच पाण्यात तोंड घातलं. तरीही त्याची नजर इकडे-तिकडे घुटमळतच होती. तेवढय़ात. अचानक पाणी हललं. विजेच्या वेगानं एक मगर झप्पकन बाहेर आली आणि तिनं हरणाला आपल्या जबडय़ात पकडलं आणि ओढत पाण्यात नेलं.
पण पुढे मी पाहू शकले नाही. 


यूटय़ूबवरचा व्हीडीओ होता तो!
पण मगर किती डेंजर प्राणी आहे, हे आपल्याला माहीत आहे. आपल्या टप्प्यात आलेल्या अशा मोठय़ा प्राण्यांची आणि गुरांचीही शिकार मगर करू शकते. मगर पाण्यात राहात असली, तरी ब:याचदा ती  किना:यावर तोंडाचा आ करून ऊन खात पडलेली आपल्याला दिसून येईल. 
तिला चालताना तुम्ही कधी पाहिलंय?
जरुर पाहा. नाहीतर मी सांगते तसं करा. एकदम मगरीसारखं चालल्याचा भास तुम्हाला होईल. या व्यायामाला म्हणायचं ‘अॅलिगेटर ड्रॅग’. ड्रॅग म्हणजे ओढणो. तिच्यासारखंच आपल्याला आपलं संपूर्ण शरीर पुढच्या फक्त दोन ‘पायांनी’; म्हणजे हातांनी ओढत न्यायचं आहे. 
कसा कराल हा व्यायाम?
1- पुश अप्स, जोर काढण्यासाठी जशी पोङिाशन घेतो तशी, पोङिाशन घ्या, म्हणजे जमिनीवर दोन्ही हातांचे तळवे टेकवा. 
2- पाय मागे सोडलेले. जणू पायांत काही त्रणच नाही. 
3- नजर समोर. शरीराचा सगळा भार फक्त हातांवर.
4- पायांचा कुठलाही वापर न करता, फक्त हातांवर पुढे पुढे चाला. पाय मागून सरपटत आले पाहिजेत. 
5- पाय जर ओढले जात नसतील, तर एक आयडिया करा. पायांखाली एखादी प्लेट किंवा टॉवेल ठेवा. त्यामुळे पाय ओढायला मदत होईल.
यामुळे काय होईल?
1- पोटाचा डेंजर व्यायाम होईल.
2- एखाद्याला एक ठेवली, तर ‘पाणी’ मागेल, इतके हात फौलादी होतील. 
3- कार्डिओ एक्सरसाइज होईल.
4- स्टॅबिलिटी वाढेल.
कराल मग हा व्यायाम? पण हा व्यायाम करून पंगा मात्र घेऊ नका. मला तिच्या आणखीही ब:याच ट्रिक माहीत आहेत.
- तुमचीच ‘मगरमच्छ’, ऊर्जा

Web Title: alligator drag -exercise at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.