शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'या' 5 राशिच्या लोकांना असते फिरण्याची आवड ; जाणून घ्या तुमच्या राशिबाबत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 13:14 IST

फिरण्याची आवड प्रत्येकालाच असते. मग ती कोणत्याही वयाची व्यक्ती असली तरीदेखील तिला फिरायला आवडतं. वेगवेगळ्या ठिकाणी फिरणं, तेथील ठिकाणांना भेट देणं, त्याचा इतिहास जाणून घेणं ही प्रत्येकाचीच आवड असते.

फिरण्याची आवड प्रत्येकालाच असते. मग ती कोणत्याही वयाची व्यक्ती असली तरीदेखील तिला फिरायला आवडतं. वेगवेगळ्या ठिकाणी फिरणं, तेथील ठिकाणांना भेट देणं, त्याचा इतिहास जाणून घेणं ही प्रत्येकाचीच आवड असते. आपल्या राशीनुसार आपल्या स्वभावानुसार आपल्या आवडीनिवडीही समजतात. आपल्या राशिंचा आधार घेऊन आपल्याला फिरायला किती आवडतं, हे जाणून घेता येतं. तसेच आपली फिरण्याची आवड कशी पूर्ण करता हेही समजणं शक्य होतं. जाणून घेऊयात अशा 5 राशींच्या लोकांबाबत ज्यांना फिरायला फार आवडतं.

1. मेष

मेष राशिच्या व्यक्तींना फिरण्याची फार आवड असते. या व्यक्तींचा स्वभाव शांत असतो परंतु मनाने चंचल असतात. या व्यक्ती संधी मिळता फिरण्यासाठी निघून जातात. या व्यक्तींसोबत कोणी असो किंवा नसो या व्यक्तींना काही फरक पडत नाही. कधीकधी तर या व्यक्ती एकट्याही फिरण्यासाठी निघून जातात. 

2. मिथुन

स्वभावाने सोशल असणाऱ्या या लोकांना फिरण्याचीही आवड असते. मिथुन राशीच्या लोकांना फिरण्यासोबतच नवीन लोकांसोबत बोलणं, ओळखी वाढवणं, त्यांची संस्कृती समजून घेणं आवडतं. या राशिच्या लोकांना नेहमी नवीन लोकांना भेटणं आवडतं. या राशिची लोकं फार कमी वेळात प्लॅन करून फिरण्यासाठी निघून जातात.

3. कर्क

घर आणि कामाच्या वेळांमध्ये बॅलेंन्स साधून आणि आयुष्यातील धावपळीतून थोडा ब्रेक घेण्यासाठी कर्क राशिच्या व्यक्ती फिरण्याचा मार्ग स्विकारतात. या राशिची लोकं जास्तीत जास्त जवळच्या लोकांसोबत किंवा आपल्या कुटुंबासोबत फिरायला जाणं पसंत करतात. जेव्हाही या व्यक्ती एकट्याने प्रवास करत असतात, त्यावेळी ते प्रत्येक गोष्टीचं बारकाईने निरीक्षण करतात. त्याचप्रमाणे या व्यक्ती कोणत्याही व्यक्तींवर लगेच विश्वास ठेवत नाहीत. त्यामुळेच या व्यक्ती आपल्या विश्वासातील लोकांसोबत फिरायला जातात. 

4. सिंह 

सिंह राशिची लोकं नेहमी आपल्या रॉयल अंदाजासाठी ओळखली जातात. त्यामुळेच या व्यक्ती वर्षातून एकदाच फिरण्यासाठी जातात पण पूर्ण रॉयल्टीसोबत फिरायला जातात. रॉयल हॉटेल, रॉयल फूड आणि रॉयल राइड नेहमीच सिंह राशी असणाऱ्या व्यक्तींची प्रायॉरिटी असते. 

5. कन्या

कन्या राशिच्या व्यक्ती आपल्या बजेटनुसार फिरण्याचा प्लॅन करतात. या व्यक्तींना अनेक लोकांसोबत ट्रॅव्हल करणं आवडत नाही. त्याचप्रमाणे या राशिची लोकं नेहमी एखाद्या उद्धेशासाठी फिरण्याचा प्लॅन करतात. 

टॅग्स :tourismपर्यटनAstrologyफलज्योतिष