शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

विमानातही मिळणार आवडीची सीट, जेवण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 10:08 AM

दळणवळणाचे वेगवान आणि गतिमान माध्यम असलेले विमान वाहतूक क्षेत्र नवतंत्रज्ञानाचा वापर करत आधुनिक होत आहे. केवळ प्रवासीकेंद्रित सुविधांवरच नव्हे, तर पर्यावरणावर दुष्परिणाम होऊ नये, यावरही सातत्याने भर दिला जात आहे. वर्षागणिक विमान प्रवाशांच्या वाढत्या संख्येसह आगामी नववर्षात अनेक नवे बदल विमान वाहतूक क्षेत्राला नव्या उंचीवर नेतील, अशी अपेक्षा आहे.

- जयदीप मिरचंदानी, अध्यक्ष, स्कायवनलीकडच्या काही वर्षांत विमान प्रवासादरम्यान वैयक्तिक सेवासुविधा मिळविण्याबाबत प्रवासी भर देत आहेत. प्रवासादरम्यान त्यांना काय हवे, काय नको याकडे विमान कंपन्याही लक्ष देत आहेत. त्यानुसार अधिकाधिक प्रवासीकेंद्रित सुविधा देण्यासाठी आवडीप्रमाणे सीट क्रमांक, जेवणामध्ये प्रवाशांना आवडणारे आणि मागणीप्रमाणे पर्याय उपलब्ध करण्यासह वैयक्तिक सुविधांवर कंपन्या भर देत आहेत. अन्य क्षेत्राप्रमाणे विमान वाहतूक क्षेत्रातही कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), मशीन लर्निंग (एमएल), ऑगमेंटेड रिॲलिटी (एआर) तसेच ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत.

एअर इंडियाने नुकताच ‘महाराजा’हा बहुभाषिक व्हर्च्युअल एजंट लॉन्च केला. विमान वाहतूक सुकर होण्यासह विमानांची देखभाल-दुरुस्ती, तसेच दोष व त्रुटी दूर करण्यासाठी एआयच्या वापरावर भर दिला जाईल. सायबर हल्ले रोखत प्रवाशांचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाची मदत घेतली जाईल.  विमानांच्या उड्डाणाद्वारे कमीतकमी कार्बन उत्सर्जन होईल आणि पर्यावरणाचे संवर्धन कसे करता येईल, याकडे लक्ष दिले जात आहे. त्यासाठी शाश्वत विमान इंधन व ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन दिले जाईल. २०५० पर्यंत विमान वाहतूक क्षेत्राने शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य ठेवले आहे. प्रायोगिक तत्त्वावर काही विमान कंपन्यांनी जैव इंधनाचा थोड्या प्रमाणात वापर सुरू केला आहे.

आशियाई बाजारपेठेवर जगाचे लक्षnकोरोनानंतरच्या काळात विमान वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. २०२४ मध्ये जगातील एकूण विमान प्रवाशांची संख्या ९.४ अब्जांपर्यंत वाढण्याचा अंदाज एअरपोर्ट्स कौन्सिल इंटरनॅशनलने (एसीआय) वर्तवला आहे. त्यातही आशियाई देशांमध्ये विमान प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता अनेक  कंपन्या आशियाई बाजारपेठेत गुंतवणूक करण्यास उत्सुक असतील. nभविष्याचा वेध घेत आणि नवे ट्रेंड्स आत्मसात करत जागतिक विमान वाहतूक क्षेत्र ग्राहककेंद्रित व्यवसायाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार, शाश्वत हवाई इंधनाचा वापर, सुपरसॉनिक जेट विमानांसाठी प्रयत्न करत नववर्षात विमान कंपन्यांच्या प्रगतीचे पंख विकासाकडे झेपावतील, हे मात्र निश्चित.

टॅग्स :airplaneविमान