सगळीकडे केवळ बर्फच बर्फ....अशा गोठवणारी थंडी आणि अशा १५, ४०० फूट उंचीवरील ठिकाणावर जर तुम्हाला गरमागरम चहा किंवा कॉफी मिळाली जर विचार करा कसं वाटेल. ही काही कल्पना नाही. नेपाळमध्ये जगातला सर्वात जास्त उंचीवर असलेला कॅफे आहे. इथे एवढ्या उंचीवर चहा गरमागरम चहा पिण्याची इच्छा पूर्ण करू शकता. 'वर्ल्ड्स हाइएस्ट बेकरी कॅफे' असं याचं नाव असून हा कॅफे नेपाळच्या लोबुचेमध्ये आहे. हा कॅफे एव्हरेस्टच्या मार्गात आहे.
एव्हरेस्टला जाणारे ट्रेकर्स इथे काही वेळ थांबून आराम करतात एव्हरेस्टच्या मार्गात लागणाऱ्या या कॅफेमध्ये कॉफी, बीअर आणि अॅपल पायचा आनंद घेऊ शकता. तसेच इथे रात्री वेगवेगळ्या डाक्युमेंट्रीही दाखवल्या जातात. यातून ज्या गिर्यारोहकांना घरची आठवण येते त्यांना दिलासा मिळतो.
लोबुचे येथील हा कॅफे जगातला सर्वात उंचीवर असलेला सुंदर कॅफे आहे. इतक्या उंचीवर आणि इतक्या गोठवणाऱ्या थंडीत कॅफे चालवणं सोपं नाही. कारण इथे कॉफीसाठी पाणी गरम करायलाच जवळपास १५ मिनिटांचा कालावधी लागतो. जगातल्या या सर्वात उंच कॅफेमध्ये जाण्याआधी तुम्ही लोबुचेमधून जाल. हे जवळपास १६ हजार २१० फूट उंचीवर आहे. याच्या आजूबाजूला काही गिर्यारोहकांचे मेमेरिअल्स सुद्धा आहेत. यात स्कॉट फिशरचाही समावेश आहे. त्यांचा १९९६ मध्ये एव्हरेस्टहून परत येताना मृत्यू झाला होता.