उन्हाळ्यात रोमांचक आणि गारेगार अनुभवासाठी आवर्जून भेट द्या वायनाडला!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 11:52 AM2019-04-02T11:52:58+5:302019-04-02T12:01:59+5:30

उन्हाळा म्हटलं की, सर्वांनाच कुठेतरी थंड वातावरणाच्या ठिकाणी फिरायला जायचं असतं. हिरवीगार झाडे, खळखळणारं पाणी अनुभवायचं असतं.

Wayanad is must visit in Summer | उन्हाळ्यात रोमांचक आणि गारेगार अनुभवासाठी आवर्जून भेट द्या वायनाडला!

उन्हाळ्यात रोमांचक आणि गारेगार अनुभवासाठी आवर्जून भेट द्या वायनाडला!

उन्हाळा म्हटलं की, सर्वांनाच कुठेतरी थंड वातावरणाच्या ठिकाणी फिरायला जायचं असतं. हिरवीगार झाडे, खळखळणारं पाणी अनुभवायचं असतं. अशाच एका खास ठिकाणाची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. केरळमध्ये तर तशी फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत पण अजूनही अनेक पर्यटकांच्या नजरेपासून दूर राहिलेलं वायनाड हे ठिकाण अनेक दृष्टीने खास आहे. 

केरळमध्ये असलेलं प्रत्येक ठिकाण इतकं सुंदर आणि खास आहेत की दोन दिवसात त्यांचा आनंद घेणे कठीण आहे. यातीलच एक ठिकाण म्हणजे वायनाड. शहरापासून जवळपास ७६ किमी अंतरावर हे ठिकाण आहे. चारही बाजूने हिरवीगार झाडे, जंगलात किलबिलाट करणारे पक्षी आणि येथील अनोखी संस्कृती वेगळा अनुभव देणारी आहे. चला जाणून घेऊ या ठिकाणाची खासियत....

चेम्ब्रा पीक

२१०० मीटर उंचीवर चढाई करुन तुम्ही चेम्ब्रा पीकवर पोहोचू शकता. अशा वेगळा अनुभव कदाचित तुम्ही याआधी कधी घेतल नसेल. वायनाडमधील हे ठिकाण बघणे तुम्ही अजिबात मिस करू नका. निसर्गाच्या इतक्या जवळ जाण्याचा अनुभव कदाचित दुसरीकडे तुम्हाला कमीच मिळेल. 

नीलीमाला

वायनाडच्या दक्षिण भागातील नीलीमाला ट्रेकिंगची आवड असणाऱ्या लोकांसाठी परफेक्ट ठिकाण आहे. येथील सर्वात उंच टोकावर पोहोचून तुम्ही मीनमुट्टी वॉटरफॉलचा सुंदर नजारा बघू शकता. 

कुरूवा आयलॅंड

(Image Credit : Thrillophilia)

जर तुम्ही वायनाडला फिरायला गेला असाल तर आयुष्यभर विसरता न येणारा अनुभव घेण्यासाठी तुम्ही कुरूवा आयलॅंडला भेट देऊ शकता. महत्त्वाची बाब म्हणजे इथे जाण्यासाठी तुम्हाला बांबू राइडने प्रवास करावा लागेल. कबीनी नदीमध्ये डेल्टा द्वारे तयार करण्यात आलेला हा छोट्या आयलॅंड्सचा समूह आहे. इथे तुम्ही पक्षी, वेगवेगळी फुलं आणि वेगवेगळ्या वनस्पती बघायला मिळतात. त्यासोबतच बांबू आणि काही दुर्मिळ झाडांनाही इथे बघता येईल. 

रिव्हर राफ्टिंग

चारही बाजूने हिरव्यागार झाडांनी वेढलेल्या वायनाडमध्ये नद्या, तलाव आणि खळखळून वाहणाऱ्या झऱ्यांची कमतरता नाहीये. इथे तुम्हाला अॅडव्हेंचरचा पूर्ण आनंद घेता येणार आहे. अनोथ, मननथावडी आणि पाझासी पार्कला जाऊन तुम्ही राफ्टिंगचा आनंद घेऊ शकता. वेगवेगळ्या ठिकाणी राफ्टिंगच्या वेगवेगळ्या लेव्हल आहेत. तुम्हाला हवं ते तुम्ही करू शकता. 

बनसुरा डॅममध्ये बोटिंगचा आनंद

वायनाडमध्ये पर्यटकांना आकर्षित करतं ते येथील नैसर्गिक सौंदर्य. त्यात हे सौंदर्य दुप्पट करतो बनसुरा डॅम. या डॅममध्ये तुम्ही बोटींगचा मनमुराद आनंद घेऊ शकता. इथे रोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बोटींग करू शकता. हा डॅम जगातल्या सर्वात मोठ्या डॅमपैकी एक आहे. 

वायनाड वाइल्डलाइफ अभयारण्य

वायनाडमध्ये अभायारण्य आणि हत्ती प्रकल्प आहे. इथे येणाऱ्या पर्यटकांमध्ये या ठिकाणांना टॉप प्रायोरिटी असते. ३४५ किमी परिसरात पसरलेल्या या अभयारण्यात वेगवेगळे प्राणी आणि पक्षी तुम्ही बघू शकता. 

कधी जाल?

वायनाडच्या नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी ऑक्टोबर ते मे हा कालावधी सर्वात बेस्ट मानला जातो. यादरम्यान तुम्ही वेगवेगळ्या राइडचा आनंद घेऊ शकता. तसेच उन्हाळा असूनही तुम्हाला इथे उन्हाळा जाणवणार नाही हे महत्त्वाचं. 


Web Title: Wayanad is must visit in Summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.