शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

प्री-वेडिंग शूट आणि रोमॅंटिक डिनरसाठी बेस्ट डेस्टिनेशन नीमराना किल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 11:18 IST

दिल्लीजवळ असलेला १५ शतकातील नीमराना किल्ला आजही विकेंड एन्जॉयमेंटसाठी एक बेस्ट डेस्टिनेशन म्हणून लोकप्रिय आहे.

राजस्थानच्या अलवरजवळ असलेला १५ शतकातील नीमराना किल्ला आजही विकेंड एन्जॉयमेंटसाठी एक बेस्ट डेस्टिनेशन म्हणून लोकप्रिय आहे. इथे तुम्ही हॅगिंग्स गार्डन, स्वीमिंग पूल, आयुर्वेदिक स्पा चा आनंद घेऊ शकता. खासकरुन येथील रात्रीचा नजारा बघण्यासाठी लोक मोठी गर्दी करतात. तसेच प्री-वेडींग शूट करण्यासाठी, पार्टनरला सरप्राइज देण्यासाठी आणि रोमॅंटिक डिनरसाठी हे ठिकाण परफेक्ट मानलं जातं. 

किल्ल्याची बनावट

हा किल्ला ५५२ वर्ष जुना आहे. १० मजली हा किल्ला अरावली डोंगर कापून ३ एकर परिसरात तयार करण्यात आला आहे. इथे रुम केवळ दिवसा मिळतात. जर तुम्हाला केवळ फिरायला जायचं असेल तर तिकीट घेऊन तुम्ही दोन तास किल्ल्याची सैर करु शकता. 

नीमराना किल्ल्याच्या इंटेरिअरमध्ये इंग्रजांची छाप बघायला मिळते. यात ओपन स्वीमिंग पूलही तयार करण्यात आला आहे. नाश्त्यासाठी राजमहल आणि हवामहल, तर जेवणासाठी आमखास, पांच महल, अमलतास, अरण्य महल, होली कुंड आमि महा बुर्ज आहेत. यावरुनच किल्ल्याच्या शाही थाटाचा अंदाज येतो. या किल्लाची खासियत म्हणजे इथे असलेल्या प्रत्येक रुमला वेगळं नाव आहे. 

केसरोली

नीमरानापासून काही अंतरावर केसरोली शहर आहे, जे आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखलं जातं. या ठिकाणाबाबत म्हटलं जातं की, पांडवांनी इथे वास्तव्य केलं होतं. इथे हनुमानाची झोपलेली मूर्ती आणि जुने जलाशयही बघायला मिळतात. 

कसे जाल

रस्ते मार्गे

दिल्लीहून जयपूर हायवेवर साधारण १२२ किमी प्रवास करुन तुम्ही नीमराणा किल्ल्याला पोहोचू शकता.

रेल्वे मार्ग

येथील जवळील रेल्वे स्टेशन अलवर आहे. जे जवळपास ७० किमी अंतरावर आहे. 

विमान मार्गे

इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट येथील सर्वात जवळील एअरपोर्ट आहे. हे येथून १०८ किमी दूर आहे.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सRajasthanराजस्थान