शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

'या' विदेशी ठिकाणी फिरण्यासाठी जास्त पैसे लागणार नाहीत, सरकार 'ही' सुविधा देते फ्री! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 15:28 IST

आज आम्ही तुम्हाला अशा काही देशांबद्दल सांगणार आहोत, जिथे ट्रान्सपोर्ट सर्व्हिस फ्री आहे.

हिवाळ्यात फिरण्याचा प्लॅन बनवताना सर्वात जास्त लक्ष बजेटकडे दिले जाते. कमीत कमी खर्चात उत्तम ट्रिप व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. ट्रान्सपोर्ट हा कोणत्याही ट्रिपचा महत्त्वाचा भाग असतो. ट्रान्सपोर्टचा खर्च वाचला तर अतिशय कमी बजेटमध्ये चांगली सहल पूर्ण करता येईल. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला अशा काही देशांबद्दल सांगणार आहोत, जिथे ट्रान्सपोर्ट सर्व्हिस फ्री आहे.

कॅनडा2012 पासून कॅनडातील चांबली आणि जवळपासच्या शहरांमध्ये फ्री ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था आहे, असा दावा एका मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

लक्झेंबर्ग2020 पासून लक्झेंबर्गने येथील रहिवाशांसाठी फ्री ट्रान्सपोर्टची सुविधा सुरू केली आहे. पर्यावरणाच्या समस्येमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

पर्थ, ऑस्ट्रेलियापर्थ, ऑस्ट्रेलियामध्ये फ्री ट्रान्सपोर्टची सुविधा आहे, जरी बाहेरच्या शहरातून लोकांना पैसे द्यावे लागतात.

मॅरीहॅमन, फिनलँडमॅरीहॅमनही अॅलँडची राजधानी आहे, जे एक स्वायत्त बेट आहे आणि फिनलँड प्रजासत्ताकच्या अंतर्गत येते. रिपोर्टनुसार, येथे येणाऱ्या पर्यटकांना आणि रहिवाशांना फ्री पब्लिक ट्रान्सपोर्टची सुविधा मिळते.

अवेस्ता, स्वीडनस्वीडनच्या अवेस्ता शहरातही लोकांना फ्री पब्लिक ट्रान्सपोर्टची सुविधा मिळते. अनेक वर्षांपासून येथे ही सुविधा दिली जात आहे.

याशिवाय, एस्टोनियातील टॅलिन, युकेमधील ड्यूसबरी, अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिना येथील क्लेमसन, क्लेमसन युनिव्हर्सिटी, पेंडलटन, सेंट्रल आणि सेनेका येथेही फ्री पब्लिक ट्रान्सपोर्ट उपलब्ध आहे.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सJara hatkeजरा हटके