शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
भारताच्या अनेक चेक पॉईंटवर चीनचा कब्जा, केंद्र सरकारचं मौन, शशी थरूर यांचा आरोप
3
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
4
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
5
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
6
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
7
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
8
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
9
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
10
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
11
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
12
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
13
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
14
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
15
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
16
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
17
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
18
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
19
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
20
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."

उत्तम संगीत ऐकायचं असेल तर संगीत पर्यटन करा... आहे की नाही भन्नाट आयडिया!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 6:01 PM

भारतासारख्या देशात तर संगीताचे विविध प्रकार पाहायला मिळतात. त्यामुळे तुम्ही संगीताचे निस्सीम चाहते असाल तर संगीत पर्यटनाला बाहेर पडलंच पाहिजे. त्यासाठी देशात पाच उत्तम ठिकाणं आहेत.

ठळक मुद्दे* संगीताचं प्राचीन आणि अस्सल रूप पाहायचं असेल तर या यादीत वाराणसी उर्फ काशीचा क्र मांक सर्वांत वरचा आहे. ‘युनेस्को’नं सुद्धा वाराणसीला संगीताचं शहर म्हणून घोषित केलंय.* भारतीय संगीताच्या इतिहासात राजस्थानला अगदी मानाचं स्थान आहे. इथलं लोकसंगीत स्थानिक देवदेवतांशी जास्त जोडलेलं आहे. उदयपूर, जोधपूर आणि जयपूर ही संस्थानं राजस्थानी संगीताच्या उगमाची प्रतीके मानली जातात.* संगीताचा आनंद लुटण्यासाठी मुंबई हे देखील उत्तम ठिकाण आहे. या शहराइतकी संगीत आणि नृत्यातली विविधता दुस-या शहरात सापडणं कदाचित अवघड आहे. कारण महाराष्ट्रीयन परंपरेतल्या लावणी, कोळी नृत्यापासून ते बॉलिवूड म्युझिक, रॉक कॉन्सर्टसारखे अनेक प्रकार या शहराच्या स

 

- अमृता कदमपर्यटनामागे प्रत्येकाची कारणं ही वेगळी असू शकतात. कुणाला ट्रेकिंगसारखं साहस करायला आवडतं तर कुणी निसर्गप्रेमी जंगलाच्या वाटा शोधत पशु-पक्षांच्या शोधात भटकत असतो. पक्के कानसेन आणि संगीतप्रेमी उत्तम संगीताच्या शोधातही पायाला भिंगरी बांधून फिरतात.भारतासारख्या देशात तर संगीताचे विविध प्रकार पाहायला मिळतात. त्यामुळे तुम्ही संगीताचे निस्सीम चाहते असाल तर संगीत पर्यटनाला बाहेर पडलंच पाहिजे.1. वाराणसी

संगीताचं प्राचीन आणि अस्सल रूप पाहायचं असेल तर या यादीत वाराणसी उर्फ काशीचा क्र मांक सर्वांत वरचा आहे. ‘युनेस्को’नं सुद्धा वाराणसीला संगीताचं शहर म्हणून घोषित केलंय. भगवान शंकरानं वसवलेल्या या भूमीला संगीत आणि नृत्याची देण पुरातन काळापासून लाभलीये. ‘भारतीय शास्त्रीय संगीताची गंगोत्री’ म्हणून वाराणसीचा उल्लेख केला तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण सितार पंडित रविशंकर असोत, संगीतकार गिरीजादेवी असोत किंवा शहनाई वादक उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांसारखे अनेक दिग्गज याच शहरानं दिलेले आहेत. इतका समृद्ध वारसा लाभलेल्या या शहराला ‘सिटी आॅफ म्युझिक’चा मान मिळाला तर त्यात नवल ते काय असणार? वाराणसीच्या अस्सी घाटावर रोज सकाळी सूर्योदयाच्या पहिल्या किरणांसोबत ‘सुबह-ए-बनारस’ या संगीतमय कार्यक्र माचं आयोजन होतं. सकाळच्या पवित्र वातावरणात, गंगेच्या काठावर संगीत ऐकण्याची ही आध्यात्मिक अनुभूती अजिबात चुकवू नये अशीच आहे.

 

2. बेंगळुरू

संगीताच्या दुनियेत बेंगळुरु चंही नाव मोठं आहे. शास्त्रीय संगीतातला कर्नाटकी गायन हा सर्वांत प्रसिद्ध प्रकारही इथलाच आहे. कर्नाटक संगीत हे बहुतांशपणे भक्तीसंगीताच्या रूपात पाहायला मिळतं. दक्षिण भारताच्या अनेक भागांत हे संगीत लोकप्रिय आहे. या शहरात तुम्हाला ‘कर्नाटक कॉन्सर्ट’ आणि ‘कर्नाटक संगीत’ अशा अनेक मोठमोठ्या संस्थाही आढळतील. कर्नाटकी संगीत इथल्या लोकांना शांती, समृद्धी आणि आनंद देण्याचं काम अनेक वर्षे करत आलेलं आहे. वर्षातल्या कुठल्याही वेळेला गेलात तरी शहरात तुम्हाला कुठे ना कुठे संगीताचे कार्यक्र म जरु र आढळतील. त्यामुळे पर्यटकांचाही अशा कार्यक्र मांकडे ओढा असतो. 

3. पंजाब

संगीतप्रेमी प्रदेशांची यादी करतोय आणि त्यात पंजाबचं नाव नाही असं कधी होऊच शकणार नाही. पंजाबमध्ये गायनाचे अनेक पारंपरिक प्रकार आजही आपली एक विशिष्ट ओळख जपून आहेत. पंजाबमधल्या कुठल्याही उत्सवाची सुरूवात ही ढोल संगीतापासूनच होते. लग्न असो की निसर्गाचं स्वागत करणारे पारंपरिक सण पंजाबी संगीताशिवाय काहीही साजरं होणं शक्यच नाही. मन-ढोल, भांगडा, गिद्धा, झापी आणि पापा हे तर या पंजाबी संस्कृतीची ओळख बनलेले प्रकार आहेत. पंजाबी संगीताची खासियत ही आहे की या संगीतात एक जिवंत, सकारात्मक ऊर्जा देणारा भाव पाहायला मिळतो.

 

 

4. राजस्थान

भारतीय संगीताच्या इतिहासात राजस्थानला अगदी मानाचं स्थान आहे. इथलं लोकसंगीत स्थानिक देवदेवतांशी जास्त जोडलेलं आहे. उदयपूर, जोधपूर आणि जयपूर ही संस्थानं राजस्थानी संगीताच्या उगमाची प्रतीके मानली जातात. वेगवेगळ्या जाती-जमातींनुसार इथल्या संगीताचा बाज बदलताना पाहायला मिळतो. अनेक जाती तर अशा आहेत ज्या अजूनही आपल्या पूर्वजांकडून आलेला संगीताचा वारसा जोपासण्याचे काम मनापासून करताहेत. संगीताच्या तालावर केला जाणारा घुमर हा लोकनृत्याचा प्रकारही फार प्रसिद्ध आहे. शिवाय राजस्थानमध्ये अनेक मोठे संगीत महोत्सवही आयोजित केले जातात. 

5. मुंबई

संगीताचा आनंद लुटण्यासाठी मुंबई हे देखील उत्तम ठिकाण आहे. या शहराइतकी संगीत आणि नृत्यातली विविधता दुस-या शहरात सापडणं कदाचित अवघड आहे. कारण महाराष्ट्रीयन परंपरेतल्या लावणी, कोळी नृत्यापासून ते बॉलिवूड म्युझिक, रॉक कॉन्सर्टसारखे अनेक प्रकार या शहराच्या संस्कृतीनं जोपासलेले आहेत.त्यामुळे उत्तम संगीताच्या शोधात यापैकी एखाद्या शहराची मनसोक्त भटकंती करायला हरकत नाही. शहरातल्या सांस्कृतिक कार्यक्र मांचं कॅलेंडर पाहून ट्रिप प्लॅन केली तर या शहरात नियमितपणे होणा-या कार्यक्रमांपैकी एखाद्या चांगल्या कार्यक्र माला उपस्थित राहण्याची संधी तुम्हाला मिळू शकते.