शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
3
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
4
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
5
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
6
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
7
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
8
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
9
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
10
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
11
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
12
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
13
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
14
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
15
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
16
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
17
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
18
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
19
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
20
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?

सीफूड आणि अॅडव्हेंचरचा मूड असेल तर 'हे' शहर आहे परफेक्ट डेस्टिनेशन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2018 18:14 IST

आम्ही तुम्हाला एक परफेक्ट समर  हॉलिडे घालवण्यासाठी एक परफेक्ट डेस्टिनेशनचा पर्याय सांगत आहोत. ते डेस्टिनेशन आहे केरळ राज्यातील कोच्चि.

उन्हाळा आला की, अनेकजण आपल्या मित्रांसोबत किंवा परीवारासोबत फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. यात अनेकदा काश्मीर, शिमला, उत्तराखंड किंवा इतरही थंड हवेच्या ठिकाणांना प्राधान्य दिलं जातं. पण आज आम्ही तुम्हाला परफेक्ट समर  हॉलिडे घालवण्यासाठी एक परफेक्ट डेस्टिनेशनचा पर्याय सांगत आहोत. ते डेस्टिनेशन आहे केरळ राज्यातील कोच्चि. कोच्चि शहरात येऊन तुम्ही तुमच्या सुट्ट्यांचा पुरेपूर आनंद घेऊ शकता. वॉटर अॅडव्हेंचर आणि सीफूडचा मनसोक्त आनंदही तुम्ही इथे लुटू शकता. चला जाणून घेऊया का हे शहर आहे बेस्ट डेस्टिनेशन...

कोच्चिचा सुंदर किल्ला

कोच्चि किल्ला कोच्चि शहराचा महत्वाचा भाग आहे. समुद्रात वसलेल्या या प्राचीन किल्ल्याला एका मजबूत पुलाने जोडले गेले आहे. हे ठिकाण जितकं त्याच्या सुंदरतेसाठी प्रसिद्ध आहे तितकंच तिथे मिळणा-या स्वादिष्ट जेवणासाठीही प्रसिद्ध आहे. या किल्ल्याची सैर तुम्ही पायी आणि सायकलनेही करु शकता. सायकल आणि बाईक इथे तुम्हाला सहज उपलब्ध होतील.

चेराई बीचवरील शांतता

शहरातील गर्दीला वैतागले असाल आणि यातून दूर कुठेतरी शांतता मिळवण्याचा विचार करत असाल तर हे ठिकाण परफेक्ट आहे. इतकेच काय तर तुम्ही इथे वॉटर स्पोर्टचा मनमुराद आनंद घेऊ शकता. चेराई बीच हा कोच्चितील अनेक लोकप्रिय समुद्र किना-यांपैकी एक आहे. हा बीच कोच्चिपासून जवळपास 25 किमी अंतरावर आहे. इथला सुर्योदय आणि सुर्यास्त बघण्यासाठी इथे मोठ्या प्रमाणात गर्दी केली जाते. इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं सीफूड एन्जॉय करता येईल.

सेंट फ्रान्सिस चर्च

सेंट फ्रान्सिस चर्च हे भारतातील पहिलं यूरोपियन चर्च आहे. हे चर्च 1503 मध्ये बांधण्यात आलं होतं. हे चर्च कोच्चि किल्ल्याच्या बाजूलाच आहे. या चर्चबाबत अशी आख्यायिका आहे की, या चर्चमध्ये वास्को द गामा याचा मृतदेह दफन करण्यात आला होता. त्यानंतर चौदा वर्षांनी त्याचा मृतदेह लिस्बोन येथे नेण्यात आला.

मट्टनचेरी महल

मट्टनचेरी महल हे एक डच महल या नावानेही ओळखलं जातं. या महलात वेगवेगळ्या संस्कृतींचं डोळ्यांचं पारणं फेडणारं मिश्रण बघायला मिळतं. हा महल पोर्तुगिजांनी 1555 मध्ये वीर केरळ वर्मासाठी तयार करण्यात केला होता. तो त्यावेळी कोच्चिचा शासक होता. 

उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांसोबत या 5 ठिकाणांना आवर्जून भेट दया!

मरीन ड्राईव्ह

मुंबई प्रमाणेच कोच्चिमध्येही एक मरीन ड्राईव्ह आहे. दर रविवारी इथे लोक सूर्यास्त बघण्यासाठी मोठी गर्दी करतात. 

ज्यू शहर 

कोच्चि शहर हे एक प्राचीन ज्यू लोकांची वस्ती आहे. त्यामुळे येथील संस्कृती आणि वास्तूशिल्प पर्यटकांना आकर्षित करतात. हे शहर भारतातील इतर शहरांपेक्षा वेगळं असण्याचं कारण म्हणजे या शहरातील ज्यू लोकसंख्या. इतिहासात सांगण्यात आलं आहे की, ज्यू लोक इथे ईवीस पूर्व 700 मध्ये व्यापार करण्यासाठी आले होते. आणि नंतर येथील संस्कृतीत एकरुप झाले.

अॅडव्हेंचर, सुंदर डोंगर आणि वेगळ्या पदार्थांचा अनुभव देणारं गंगटोक

एर्नाकुलाथाप्पन मंदिर

एर्नाकुलाथाप्पन मंदिर हे भगवाल शिवाला समर्पित करण्यात आलं आहे. हे मंदिर कोच्चितील प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक आहे.

टॅग्स :Travelप्रवासKeralaकेरळ