अॅडव्हेंचर, सुंदर डोंगर आणि वेगळ्या पदार्थांचा अनुभव देणारं गंगटोक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2018 12:55 PM2018-04-19T12:55:52+5:302018-04-19T12:55:52+5:30

शहरातील धावपळीच्या जगण्यापासून थोडावेळ का होईना दूर जायचं असेल आणि नैसर्गिक सुंदरतेचा अनुभव जवळून घ्यायचा असेल तर.....

Gangtok tourism guide what visit gangtok sikkim/ | अॅडव्हेंचर, सुंदर डोंगर आणि वेगळ्या पदार्थांचा अनुभव देणारं गंगटोक

अॅडव्हेंचर, सुंदर डोंगर आणि वेगळ्या पदार्थांचा अनुभव देणारं गंगटोक

googlenewsNext

शहरातील धावपळीच्या जगण्यापासून थोडावेळ का होईना दूर जायचं असेल आणि नैसर्गिक सुंदरतेचा अनुभव जवळून घ्यायचा असेल तर सिक्कीमची राजधानी गंगटोक तुमच्यासाठी एक परफेक्ट ट्रॅव्हल डेस्टिनेशन ठरु शकतं. इथल्या निसर्गाच्या सानिध्यात आल्यावर तुम्हाला एका वेगळ्याच विश्वात गेल्याचा अनुभव मिळेल. जर तुम्ही सिक्कीममध्ये चार ते पाच दिवसांचा प्लॅन केला तर ईस्ट सिक्कीम तुम्ही पाहू शकता. चला जाणून घेऊया इथली खासियत....

1) बकथांग वॉटर फॉल 

गंगटोकमध्ये फिरण्याची सुरुवात तुम्ही येथील एकुलत्या एक वॉटरफॉलने करु शकता. या वॉटर फॉलजवळ एक पूल बांधण्यात आलाय, त्यामुळे या वॉटर फॉलची मजा तुम्ही जवळून घेऊ शकता. इथे जवळच एक रेस्टॉरंटही आहे, जिथे तुम्ही धबधब्याचा आनंद घेत चहा-कॉफी घेऊ शकता.

2) फुलांचं प्रदर्शन

हे खास फुलांचं प्रदर्शन गंगटोकच्या सुंदरतेत आणखी भर घालतं. गंगटोकमधील लोकांना फुलांची फार आवड आहे. त्यामुळे इथे तुम्हाला वेगवेगळी फुलं बघायला मिळतील.  इथे एक फुलांचं प्रदर्शन भरतं, त्यात प्रवेश मिऴवण्यासाठी एका व्यक्तिला 20 रुपये लागतील. 

3) ताशी व्ह्यू पॉईंट

या जागेवरुन कंचनगंगाचं मनमोहक दृश्य दिसतं, त्यामुळे हे ठिकाण चांगलंच प्रसिद्ध आहे. येथील खास नजारा पाहण्यासाठी सकाळी 5 वाजता तुम्हाला जावं लागेल. 

4) गणेश टांक

गणेश टाकं हे एक श्रीगणेशाचं मंदिर आहे. इथे हिंदू मंदिरांना टांक म्हटलं जातं. त्या ठिकाणावर हे मंदिर आहे, तो नजारा पाहण्यासाठी लोक तूफान गर्दी करतात. 

5) हनुमान टांक

साधारण 1900 मीटर उंचीवर असलेल्या या मंदिरात वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची बाग आहे. या मंदिराला अनेक मजले आहेत. पाय-यांच्या माध्यमातून वरच्या बाजूला जाता येतं. येथील सर्वात वरच्या मजल्यावरुन गंगटोकचा मनमोहक नजारा बघता येऊ शकतो.

6) रोप वे

तुम्हाला तुमच्या ट्रिपमध्ये जर काही अॅडव्हेंचरस करायचं असेल तर गंगटोकमध्ये तुम्ही रोप वे सफर करु शकता. बर्फाने वेढलेल्या डोंगरांमधून रोप वे ची सफर करताना तुमच्या सर्व चिंता दूर होतील. आणि तुमची ही ट्रिप नेहमीसाठी लक्षात राहिल. 

8) खाद्य पदार्थ

इथे आल्यावर केवळ फिरण्याचीच नाहीतर खाण्याचीही मजा करु शकता. इथे आल्यावर तुम्ही मोमोज खाणे अजिबात विसरु नका. त्यासोबतच इथे तुम्ही पोर्क आणि भाज्यांना पीठात लपेटून शिजवलं जातं आणि तो पदार्थ सूपसोबत दिला जातो. येथील वा-वाई हे आणखी एक लोकप्रिय पदार्थ आहे. हा पदार्थ नूडल्सपासून तयार केला जातो. तसंच इथे थुपका, चाउमिन, थनथुक, फकथू वानटन आणि ग्‍याथुक हे पदार्थही प्रसिद्ध आहेत. 

(फोटो- द नॅशनल, विकिपीडिया, ओयो, अलामी)

Web Title: Gangtok tourism guide what visit gangtok sikkim/

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Travelप्रवास