शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
2
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
3
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
4
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
6
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
7
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
8
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
9
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
10
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
11
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
12
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
13
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
14
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
16
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
17
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
18
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
19
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
20
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ

पर्यटकांची पावले वळली पावसाळी पर्यटनाकडे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 06:55 IST

डोंगररांंगांनी वेढलेल्या व निसर्गसौंदर्याने नटलेली पावसाळी पर्यटन म्हणजे पर्यटकांना जणू काही पर्वणीच असते.

तुकाराम रोकडे खोडाळा : जून महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यावर पालघर जिल्ह्यात हमखास पावसाळी पर्यटनाला उधाण येते. जिल्ह्यातील विविध ठिकाणांचे पांढरेशुभ्र धबधबे, धरणांचे ओव्हरफ्लो होणारे पाणी, डोंगरावरून खळखळत वाहणाऱ्या जलधारा पर्यटकांना आकर्षित करतात. पावसाळी पर्यटनासाठी निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या व ग्रामीण भागातील निसर्गाचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी पर्यटक ग्रामीण भागात पोहोचतात. डोंगररांंगांनी वेढलेल्या व निसर्गसौंदर्याने नटलेली पावसाळी पर्यटन म्हणजे पर्यटकांना जणू काही पर्वणीच असते.

मुसळधार पाऊस सुरू झाला की पर्यटक निसर्गप्रेमींना वेध लागतात ते ग्रामीण भागातील धबधबे, वाहते पाण्याचे प्रवाह व धरणाच्या पाण्यात चिंब भिजण्याचे व मनसोक्त पावसाचा आनंद घेण्याचे. मग त्यांची पावले आपोआप धबधबे, धरणे व उंचावरून कोसळणारा पाण्याचा प्रवाह, धुक्याचे वातावरण हे सारे अनुभवण्यासाठी वळतात. पावसाळ्याचा मनसोक्त आनंद पर्यटक लुटतात. ढगांचा गडगडाट, थंडगार वातावरण, मातीचा सुगंध आणि बहरलेला निसर्ग हे सर्व काही जुळून येते ते पावसाळ्यातच.

जूनमधील दोन-चार दिवसांचा पाऊस सोडला तर जुलैमध्ये मुसळधार पावसाची प्रतीक्षाच केली जात असतानाच पुनर्वसू नक्षत्रात पाऊस दोन-तीन दिवस धो-धो कोसळला अन् पावसाळी पर्यटक स्वच्छंद फिरण्यासाठी गावरानावर वळू लागला. 

पालघर-नाशिकचे धबधबे आकर्षणपालघर तसेच नजीकच्या नाशिक जिल्ह्यातील अप्पर वैतरणा धरण, भावली धरण, भावली धबधबा, देवगाव परिसर, भंडारदरा धरण, खोडाळा, कळसूबाई, श्रीघाट, सूर्यमाळ, आमले घाट, अशोका धबधबा, त्र्यंबकेश्वर, ब्रह्मगिरी, अंजनेरी, जव्हार, इगतपुरी या ठिकाणी जाण्यासाठी पर्यटक उत्सुक असतात. त्याचप्रमाणे कसारा घाटाजवळ भातसा रिव्हर व्हॅली, उंट दरी, पाच धबधबे या ठिकाणीही पावसाळ्यात गर्दी होत असते. कसारा घाटातील धुके अनुभवण्यासाठी सकाळपासूनच अनेक तरुण धुके अनुभवण्यासाठी रस्त्यावर उभे राहतात.

टॅग्स :tourismपर्यटनRainपाऊसpalgharपालघर