हिवाळ्याची चाहूल लागली असून फेस्टिव्ह सीझन संपला आहे. परंतु, अनेक लोक असेही आहेत, जे व्हेकेशन प्लॅन करण्याचा विचार करत आहेत. अनेक लोकांना हिवाळ्यात फिरायला फार आवडतं. आपल्या फॅमिलीसोबत किंवा मित्रमंडळींसोबत या व्यक्ती ट्रिप प्लान करत असतात. आज आम्ही तुम्हाला नोव्हेंबरमध्ये फिरण्यासाठी काही बेस्ट डेस्टिनेशन्स सांगणार आहेत.
कच्छ रण उत्सव, गुजरात
गुजरातमध्ये साजरा करण्यात येणाऱ्या या उत्सवात सहभागी होण्यासाठी फक्त देशभरातीलच नाहीतर विदेशातूनही अनेक पर्यंटक येत असतात. हा उत्सव 28 ऑक्टोबर 2018 पासून सुरू झाला असून 23 फेब्रुवारीपर्यंत 2020 पर्यंत सुरू असणार आहे. येथे तुम्हाला आर्ट, म्यूझिक, कल्चरसोबतच राज्यातील इतर अट्रॅक्टिव्ह गोष्टी पाहायला मिळतील.
जैसलमेर, राजस्थान
राजस्थानमधील जैसलमेर शहराला गोल्डन सिटी म्हणून ओळखलं जातं. थंडीत जैसलमेर फिरण्याचा प्लान करू शकता. राजस्थान फिरण्यासाठी उत्तम ठिकाण आहे.
झिरो व्हॅली, अरुणाचल प्रदेश
निसर्गाच्या जवळ आणि शहरी वातावरणापासून दूर शांतिचा अनुभव घेण्यासाठी उत्तम ठिकाण ठरतं झिरो व्हॅली. येथे तुम्ही फॅमिलीसोबत किंला सोलो ट्रिपही प्लान करू शकता.
जोधपूर, राजस्थान
जोधपूरमध्ये फिरण्यासाठी अनेक अशी स्थळं आहेत, जी शहरं त्यांचा शाही इतिहास आणि संस्कृतीसाठी ओळखली जातात. निळ्या रंगात रंगलेली जोधपुरमधील घरं अत्यंत सुंदर दिसतात.
दार्जिलिंग, पश्चिम बंगाल
दार्जिलिंग पश्चिम बंगालचं स्वर्ग मानलं जातं. इथे दरवर्षी हजारोंच्या संख्यने पर्यटक भेट देत असतात. हे शहर चहाच्या बागांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. चारही बाजूने असलेल्या चहाच्या बागा आणि दार्जिलिंगचे सुंदर डोंगर तुम्हाला प्रेमात पाडतील.
बेतला नॅशनल पार्क, झारखंड
झारखंडमधील लातेहर आणि पलामू जिल्हामध्ये स्थित असलेल्या बेताल नॅशनल पार्कमध्ये तुम्हाला अनेक प्राणी आणि साप पाहायला मिळतील. याव्यतिरिक्त या पार्कमध्ये गरम पाण्याचा एक झरा आहे. जिथे हिळाळ्यात आंघोळ करण्याची एक वेगळीच गंमत आहे.
मानस नॅशनल पार्क, असाम
आसाममघील मानस नॅशनल पार्कचा समावेश यूनेस्कोच्या यादीमध्ये करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर हे नॅशनल पार्क प्रोजेक्ट टायगर रिझर्व, बायोस्फियर रिजर्व आणि एलिफेंट रिजर्व घोषित करण्यात आलं आहे.
बोधगया, बिहार
बिहारमधील बोधगया फक्त भारतातच नाहीतर जगभरातही प्रसिद्ध आहे. हे बौद्ध धर्माच्या अनुयायांचे प्रमुख स्थान आहे. जगभरातील पर्यटक संपूर्ण वर्षबर बोधगया फिरण्यासाठी येत असतात. येथे भगवान बौद्धांची अद्भूत मंदिरे आहेत.
भरतपूर बर्ड सेन्चुरी, राजस्थान
राजस्थानमधील भरतपूरमध्ये स्थित असलेली बर्ड सेन्चुरीला केवलादेव घना या नावाने ओळखलं जातं. याचं घना नाव येथे असणाऱ्या घनदाट जंगलांमुळे देण्यात आलं आहे. येथे अनेक प्रजातिंचे पक्षी आढलून येतात. तसेच यांमध्ये देशी आणि प्रवासी पक्षांचाही समावेश होतो. पक्षांव्यतिरिक्त भरतपूर नॅशनल पार्कमध्ये तुम्हाला अनेक जंगली प्राणीही पाहायला मिळतील.