शहरं
Join us  
Trending Stories
1
जैसलमेर दुर्घटनेतील मृतांचा आकडा २० वर; मोदींकडून दुःख व्यक्त, आर्थिक मदतीची घोषणा
2
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
3
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
4
'२५ हजार दिल्याशिवाय पेन्शन नाही!' रेल्वेच्या लाचखोर मुख्य अधीक्षकाला रंगेहाथ पकडलं
5
रुग्णालयात नेताना आजारी मुलाचा वाटेतच मृत्यू; धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण!
6
अमरावती-गडचिरोली मार्गावर २२० क्विंटल 'पोर्टिफाईड तांदूळ' घेऊन जाणारा ट्रक पकडला
7
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
8
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
9
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
10
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
11
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
12
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
13
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
14
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
15
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
16
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
17
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
18
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
19
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
20
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   

उन्हाळ्यात या प्रसिद्ध धबधब्यांवर सुट्टी करा एन्जॉय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2018 16:27 IST

देशातील अशाच काही भव्य आणि सुंदर धबधब्यांची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. इथे जाऊन तुम्ही या उन्हाळ्यातील सुट्टीचा पूर्णपणे आनंद लुटू शकता.

डोंगर-द-यांना कापत खळखळत खाली कोसळणारं पाणी बघितल्यावर कुणालाही टेन्शन फ्रि झाल्यासारखंच वाटेल. या उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्हालाही असंच टेन्शन फ्रि व्हायचं असेल तर तुम्ही देशातील या खास धबधब्यांना भेट देऊ शकता. देशातील अशाच काही भव्य आणि सुंदर धबधब्यांची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. इथे जाऊन तुम्ही या उन्हाळ्यातील सुट्टीचा पूर्णपणे आनंद लुटू शकता.

1) कुंचिकल फॉल, कर्नाटक

कर्नाटकातील शिमोंगा जिल्ह्यात 455 मीटर उंचीवर असलेला हा धबधबा देशातील सर्वात मोठा धबधबा आहे. भारतातील सर्वात मोठा धबधबा असण्यासोबतच हा आशियातील सर्वात मोठा धबधबा आहे. वाराही नदीतून हा धबधबा निघाला आहे. 

2) बरेहिपनी फॉल, ओड़िसा

भारत ओडिशा राज्यातील सिंपल नॅशनल पार्कमधील हा धबधबा 399 मीटर उंचीवरून खाली कोसळतो. हा धबधबा भारतातील दुसरा सर्वात मोठा धबधबा आहे. हा धबधबा सुंदर जंगलाने वेढलेला आहे. इथे येऊन तुम्हाला निसर्गाचा अगदी जवळून आनंद घेऊ शकता. 

3) नोहकलिकाय फॉल, मेघालय

340 मीटर उंचीवरुन पडणारा हा धबधबा मेघालयातील सुंदर डोंगरांनी वेढलेला आहे. चेरापुंजीजवळ असलेला हा धबधवा पावसाळ्यात आणखी खळखळून वाहतो. पावसाळ्यात हा धबधबा पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक इथे येतात. 

4) नोहस्गिथियांग जलप्रपात, मेघालय

रशियातील लोकप्रिय सेव्हन सिस्टर वॉटरफॉलच्या नावाने ओळखला जाणारा हा भारतातील चौथा सर्वात मोठा धबधबा आहे. मेघालयातील खासी पहाडी जिल्ह्यातील मावासी गावाजवळ हा धबधबा आहे. 315 मीटर उंचीवरून खाली कोसळणा-या या घबधब्याची रुंदी 70 मीटर आहे. उत्तर पूर्व भारतात असे अनेक धबधबे आहेत. इथे तुम्ही ट्रेकिंगही करु शकता.

5) दूधसागर, गोवा

गोव्यातील या धबधब्याची उंची 320 मीटर इतकी आहे. या धबधब्याचा जलस्त्रोत मांडोवी नदी आहे. हा धबधबा कर्नाटक आणि गोवा सीमेवर असून इथे तुम्हाला ट्रेकिंगही करता येतं. 

टॅग्स :Travelप्रवासwater parkवॉटर पार्क