शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
6
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
9
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
10
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
11
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
12
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
13
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
14
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
15
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
16
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
17
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

ऑक्टोबरमध्ये फिरण्यासाठी 'ही' 5 ठिकाणं आहेत खास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2019 10:51 AM

ऑक्टोबर सुरू होताच गुलाबी थंडी हळूहळू सुरू होत असल्याचं जाणवत आहे. या वातावरणात फिरण्याची गंमत औरच असते.

(Image Credit : Travelogy India)

ऑक्टोबर सुरू होताच गुलाबी थंडी हळूहळू सुरू होत असल्याचं जाणवत आहे. या वातावरणात फिरण्याची गंमत औरच असते. अशातच जर तुम्ही फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर या ठिकाणी फिरायला जाण्याचा आनंद नक्की घ्या. जाणून घेऊया कोणती ठिकाणं आहेत. जी हिवाळ्यात फिरण्यासाठी उत्तम ठरतात. 

(Image Credit : Culture Trip)

वायनाड, केरळ 

केरळमधील उत्तर पूर्व भागामध्ये असलेलं वायनाड शहर आपल्या अद्भूत निसर्गसौंदर्यासाठी ओळखलं जातं. या ठिकाणाची खासियत म्हणजे, येथे असणारं जंगल जवळपास 3000 वर्षांपूर्वीचं आहे. पावसाळ्यानंतर या ठिकाणचं सौंदर्य आणखी बहरतं. जर तुम्हाला शांत ठिकाणी फिरण्याची इच्छा असेल तर या ठिकाणी फिरण्याचा आनंद नक्की घ्या. 

(Image Credit : Goibibo)

नैनीताल, उत्तराखंड

पावसाळ्यानंतर डोंगर-दऱ्यांमध्ये फिरण्याची एक वेगळीच मजा आहे. नैनिताल भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक शहर आहे. पावसाळ्यानंतर जर तुम्हाला डोंगर दऱ्यांमध्ये फिरण्याचा आनंद घ्यायचा असेल तर नैनितालमध्ये फिरण्यासाठी नक्की जा. हिवाळ्यात येथे फिरण्याची एक वेगळीच गंमत आहे. कारण पावसाळ्यात नैनितालमध्ये खूप पाणी असतं आणि येथील निसर्गसौंदर्य न्याहाळणं म्हणजे स्वर्ग सुखचं. हिरवेगार डोंगर, ओल्ड कॉटेज आणि येथील बाजार ज्यांमध्ये लाकडापासून तयार करण्यात आलेल्या वस्तू फार सुंदर दिसतात. 

(Image Credit : Jabalpur Tourism)

बांधवगढ नॅशनल पार्क, मध्य प्रदेश जर तुम्हाला वन्य प्राणी पाहायला आवडत असतील तर हे ठिकाण फिरण्यासाठी उत्तम ठरेल. येथे जंगलामधील वाघ, हत्ती यांसारखे वन्य प्राणी पाहण्याचा अनुभव घेता येइल. येथे फिरण्यासाठी हिवाळा अत्यंत उत्तम ठरतो. कारण या दिवसांमध्ये जंगलामध्ये प्राणी तुम्हाला फिराना दिसतील. 

(Image Credit : TravelTriangle)

दार्जिलिंग, आसाम

डोंगरांमध्ये उंचावर चहाचे मळे पाहण्याची इच्छा असेल तर दार्जिलिंगला फिरण्यासाठी नक्की जा. ऑक्टोबरचा महिना येथे फिरण्यासाठी उत्तम काळ आहे. येथे तुम्ही दार्जिलिंगच्या ट्रेनमध्ये फिरण्याचा अनुभव घेऊ शकता. तसेच येथील निसर्गसौंदर्य पाहून तुमचं मन प्रसन्न होईल. 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटनKeralaकेरळ