शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

मॉन्सूनमध्ये बाईक रायडिंगचा मनमोकळा आनंद घ्यायचाय? मग 'या' गोष्टींची काळजी!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2019 1:01 PM

पावसाळा सुरू होताच बाईक रायडर्स आपल्या मित्रासोबत लॉन्ग रोड ट्रिपचा प्लॅन करू लागतात. कारण पावसाळ्यात बाईक रायडिंगची आपलीच एक वेगळी मजा असते.

(Image Credit : Wheelstreet)

पावसाळा सुरू होताच बाईक रायडर्स आपल्या मित्रासोबत लॉन्ग रोड ट्रिपचा प्लॅन करू लागतात. कारण पावसाळ्यात बाईक रायडिंगची आपलीच एक वेगळी मजा असते. एकीकडे हिरवीगार झाडे, थंड वारा आणि पावसाची रिमझिम या वातावरणात बाईकवर फिरायला जाण्याचा आनंद अनेकजण घेत असतात. पण भारतातील रस्त्यांची स्थिती पाहता कधी कधी पावसाळ्यात बाईक रायडिंग घातकही ठरू शकते. त्यामुळे बाईक रायडिंगला जाण्याआधी काही गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. 

हेल्मेटमध्ये बदल

(Image Credit : ZigWheels)

मॉन्सूनमध्ये तुम्ही जर लॉन्ग ड्राईव्हला जात असाल तर गरजेचं आहे की, हेल्मेटमध्ये अॅंटी-फॉग कोटींग करा. जेणेकरून पावसात हेल्मेटच्या काचेवर जमा होणाऱ्या दवांमुळे बईक चालण्यात अडचण येऊ नये. अॅंटी-फॉग कोटिंगने तुम्हाला पावसातही समोरचं व्यवस्थित दिसेल.

वॉटरप्रूफ रायडिंग गिअर

(Image Credit : India.com)

मॉन्सूनमध्ये बाईकने फिरायला जाणार असाल तर महत्त्वाच्या कामांमध्ये वॉटरप्रूफ रायडिंग गिअरचाही समावेश करा. हाय-व्हिजिबिलीटी रेनकोट घ्या, जो तुम्ही कपड्यांवर किंवा रायडिंग जॅकेटसोबत घालू शकाल. याने तुम्ही पावसात भिजणार नाही आणि तुम्हाला थंडीही वाजणार नाही.

टायर्स करा चेक

(Image Credit : DriveSpark)

लॉन्ग राइडला जाण्यापूर्वी तुमच्या बाईकच्या टायर्सची स्थिती चेक करा. याची काळजी घ्या की, टायरची ग्रीप व्यवस्थित असावी. याने रस्त्यावर स्लीप होण्याचा धोका राहणार नाही. तसेच तुम्ही योग्यप्रकारे तुमचा वेग कायम ठेवू शकाल आणि बिनधास्त होऊन रायडिंगचा आनंद घेऊ शकाल.

रस्त्यावर ठेवा लक्ष

(Image Credit : Autocar India)

जोपर्यंत तुमची खात्री होत नाही की, रस्त्याची स्थिती पूर्णपणे चांगली आहे, तोपर्यंत रायडिंगदरम्यान रस्त्यावरून नजर हटवू नका. कारण अचानक समोर येणारा खड्डा तुम्हाला अडचणीत टाकू शकतो. बरं होईल की, रायडिंगला जाण्याआधी कुणाकडून रस्त्याची स्थिती जाणून घ्या.

बदला रायडिंगची स्टाइल

(Image Credit : YouTube)

तुम्ही कितीही चांगली रायडिंग करत असाल तरी सुद्धा रस्त्याची वाईट स्थिती प्रत्येक रायडरला समान रूपाने प्रभावित करते. रायडिंग करताना आजूबाजूच्या वाहनांमध्ये योग्य अंतर ठेवणे महत्त्वाचं असतं. नेहमी लक्षात ठेवा की, पावसात अचानक ब्रेक लावणे टाळले पाहिजे. कारण झटका लागून  गाडी स्लीप होण्याचा धोका असतो. त्यामुळे गाडी फार वेगानेही चालवू नका आणि ब्रेकही आरामात लावा.

टॅग्स :Monsoon Specialमानसून स्पेशलTravel Tipsट्रॅव्हल टिप्स