शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

पर्यटनाचे शौकिन असाल तर ही पाच पुस्तकं वाचाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 7:27 PM

काही पुस्तकं वाचल्यावर तुम्हाला फिरण्यात नेमक्या कुठल्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, अधिक काय जाणून घ्यायला हवं हे उमजतं. म्हणूनच पर्यटन खºया अर्थानं अनुभवण्यासाठी काही पुस्तकं मुद्दाम वाचायला हवीत.

ठळक मुद्दे* ए पॅसेज टू इंडिया हे इ.एम.फोस्टरने लिहिलेलं पुस्तक ब्रिटीश काळातल्या भारतीयांच्या जीवनाची कहाणी सांगतं.* पर्यटनाबद्दलचं पुस्तक म्हणजे केवळ प्रवासवर्णनच असायला हवं असा काही नियम नाही. कधी कधी एखाद्या कादंबरीतही स्थळ, काळाचं असं बहारदार वर्णन असतं की ही ठिकाणं प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा मनात निर्माण होते.*मॅक्झिमम सिटी: बॉम्बे लॉस्ट अ‍ॅण्ड फाउन्ड हे सुकेतू मेहता यांचं पुस्तक इतकं गाजलं की अनेकदा मुंबईचा उल्लेख या पुस्तकाच्या नावानुसारच म्हणजे ‘मॅक्झिमम सिटी’ असा केला जातो.

 

- अमृता कदमपुस्तकासारखा खरा मित्र नाही असं म्हणतात. पुस्तकं तुम्हाला अनेक गोष्टींचं ज्ञान देतात, नव्या दुनियेची सफर घडवून आणतात. कधीकधी एखादं पुस्तक तुम्हाला बसल्याबसल्या नव्या देशाचा जिवंत अनुभव देतं. अशा वाचनानं तुमची जगाकडे पाहण्याची नजर बदलते, तुम्ही अधिक प्रगल्भ होतात. पर्यटनाचे क्षेत्रही याला अपवाद नाही. काही पुस्तकं वाचल्यावर तुम्हाला फिरण्यात नेमक्या कुठल्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, अधिक काय जाणून घ्यायला हवं हे उमजतं. म्हणूनच पर्यटन ख-या अर्थानं अनुभवण्यासाठी काही पुस्तकं मुद्दाम वाचायला हवीत.ए पॅसेज टू इंडिया

इ.एम.फोस्टरने लिहिलेलं हे पुस्तक ब्रिटीश काळातल्या भारतीयांच्या जीवनाची कहाणी सांगतं. हे पुस्तक 1920 साली त्यांनी भारतात घालवलेल्या अनुभवांवर आधारित आहे. एका मोठया स्थित्यंतराच्या दरम्यान ते या देशात राहिले होते. त्यामुळे हे पुस्तक वाचल्यावर एकप्रकारे स्वातंत्र्यपूर्व कालीन भारताचे दर्शन घडल्यासारखे होते.

सिटी आॅफ डीजिन्स, अ ईयर इन दिल्ली

पर्यटनाबद्दलचं पुस्तक म्हणजे केवळ प्रवासवर्णनच असायला हवं असा काही नियम नाही. कधी कधी एखाद्या कादंबरीतही स्थळ, काळाचं असं बहारदार वर्णन असतं की ही ठिकाणं प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा मनात निर्माण होते. अशाच निवडक पुस्तकांपैकी एक म्हणजे विल्यम डॉलरिम्पल यांचं हे पुस्तक. या कादबंरीतली पात्रं आणि किस्से इतक्या खुबीनं रंगवली गेलीयत की त्यामुळे एकाचवेळी दिल्ली शहराचा इतिहास आणि बदलती दिल्ली तुम्हाला अनुभवायला मिळते.

 

इट, प्रे, लव्ह

अमेरिकन लेखिका एलिजाबेथ गिलबर्टचं हे अतिशय गाजलेलं पुस्तक. इटली, इंडोनेशिया आणि भारत या तीन देशात जे जे तिनं पाहिलं ते सगळं या पुस्तकात शब्दबद्ध करण्यात आलंय. घटस्फोटानंतर लेखिका या देशांच्या सफरीवर निघाली आणि या आठवणींचा सुंदर कोलाज म्हणजे हे पुस्तक. तब्बल 182 आठवडे हे पुस्तक न्यूयॉर्क टाइम्सच्या बेस्टसेलर यादीत आपलं स्थान कायम राखून होतं. या पुस्तकावर आधारित पुढे एका चित्रपटाची निर्मितीही झाली.मॅक्झिमम सिटी: बॉम्बे लॉस्ट अ‍ॅण्ड फाउन्ड

मूळचे भारतीय वंशाचे अमेरिकन पत्रकार सुकेतू मेहता यांचं हे पुस्तक आहे. हे पुस्तक इतकं गाजलं की अनेकदा मुंबईचा उल्लेख या पुस्तकाच्या नावानुसारच म्हणजे ‘मॅक्झिमम सिटी’ असा केला जातो. मुंबईची नाइट लाइफ, इथलं राजकारण या सगळ्याचा परामर्श या कादंबरीत घेण्यात आलाय.

 

शांताराम

ग्रेगोरी डेविड रॉबर्टस या आॅस्ट्रेलियन लेखकाची ही कादंबरी आहे. या कादबंरीत एक अफलातून पात्र प्रवासवर्णनासाठी गुंफण्यात आलंय. ही कादंबरी म्हणजे आॅस्ट्रेलियाच्या तुरूंगातून पळालेल्या कैद्याची कहाणी आहे. तुरुगातून बाहेर आल्यावर हा माणूस भारत यात्रेवर निघतो. कादंबरीचा हा नायक मुंबईतली जीवनशैली पाहून थक्क होतो. मुंबईचं असं वर्णन क्वचितच कुणी केलं असेल.अर्थात ही सगळी इंग्रजी पुस्तकांची यादी आहे. पण बाहेरचे लोक आपल्या देशाला कसं बघतात हे पाहण्यासाठी ही पुस्तकं नक्की वाचायला हवीत. बाकी मराठी वाचकांसाठी मराठीतही असं चांगलं प्रवासवर्णनपर साहित्य उपलब्ध आहेच.