स्ट्रीप्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2015 23:45 IST2015-08-27T23:45:21+5:302015-08-27T23:45:21+5:30
स्ट्रीप्स

स्ट्रीप्स
स ट्रीप्सगुजरातमधील आंदोलनामुळे रेल्वेला फटकामुंबई - गुजरामध्ये आरक्षणाच्या आंदोलनामुळे रेल्वेला मोठा फटका बसला आहे. पश्चिम रेल्वेवरील २७ ऑगस्ट रोजी मुंबईतून धावणार्या लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या असतानाच आता २८ ऑगस्ट रोजीही धावणार्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात ट्रेन नंबर १२२१६ बान्द्रा टर्मिनस-दिल्ली सराई रोहिल्ला गरीब रथ एक्सप्रेसचा समावेश आहे. बारा डबा डेमूमुळे प्रवासी क्षमता वाढणारमुंबई - दिवा-वसई-रोहा मार्गावर बारा डबा डेमू ट्रेन १९ ऑगस्टपासून चालवण्यात येत आहे. ही ट्रेन याआधी आठ डब्यांची चालवण्यात येत होती. चार डबे वाढवण्यात आल्याने प्रत्येक डब्यांची प्रवासी क्षमता ३0 टक्क्यांनी वाढल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या ट्रेनच्या एकूण दहा फेर्या होतात. आणखी काही बदल यात केले जाणार आहेत.