शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

हिवाळ्यात फिरण्यासाठी खास ऑफबीट ठिकाणे, घ्या थंडीची कधीही न विसरता येणारी मजा! 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 2:50 PM

काहींना फिरायला जायचं तर असतं, पण कुठे जायचं असा प्रश्न पडतो. हिवाळा म्हटलं की, जवळपास सर्वांनाच आवडणारा हा ऋतु आहे.

जसजशी थंडी वाढत जाते तसतशी थंडीची मजा घेण्यासाठी फिरायला जाणाऱ्यांची धावपळ सुरु होते. पण काहींना फिरायला जायचं तर असतं, पण कुठे जायचं असा प्रश्न पडतो. हिवाळा म्हटलं की, जवळपास सर्वांनाच आवडणारा हा ऋतु आहे. पण यातही सुट्टीचा वेगळा आनंद अनुभवायचा असेल तर आम्ही काही ऑफबिट डेस्टिनेशनचे पर्याय तुमच्यासाठी आणले आहेत. या ठिकाणांना भेट देऊन तुम्ही कधीही विसरणार नाही, असा आनंद मिळवू शकता.  

आरु व्हॅली, काश्मीर

हिवाळ्याचा विषय निघतो आणि त्यात बर्फात खेळण्याचा उल्लेख होत नाही, असं तर होऊ शकत नाही. पण बर्फात खेळण्यासाठी तुम्हाला यूरोपलाच जाण्याची गरज नाही. काश्मीरमध्ये असे अनेक डेस्टिनेशन्स आहेत, जिथे तुम्ही कधीही एन्जॉय न केलेल्या गोष्टी अनुभवायला मिळतील. पहलगाममध्ये जेव्हा स्नोफॉल होतो, तेव्हा जगभरातील पर्यटक इथे गर्दी करतात. पांढऱ्या शुभ्र बर्फाच्या चादरीवर स्नोबूट घालून बर्फाचे गोळे खेळण्याचा आनंद काही औरच. अशातही तुम्ही वेगळ्या ठिकाणाच्या शोधात असाल तर तुम्ही पहलगामपासून केवळ १२ किमी दूर असलेल्या पाइन फॉरेस्टच्या मधोमध असलेल्या आरु व्हॅलीला भेट देऊ शकता. उंचच उचं देवदारची झाडे आणि सगळीकडे बर्फाची चादर हे दृश्य फारच मनोहारी असेल. या व्हॅलीमध्ये जम्मू अॅन्ड काश्मीर टुरिजमचे सुंदर कॉटेजही तयार केले आहेत. या कॉटेजमध्ये राहून तुम्ही सुट्टीचा मनसोक्त आनंद घेऊ शकता. या जंगलात तुम्हाला फ्रोजन वॉटरफॉलही बघायला मिळू शकतो. 

तातपानी, हिमाचल प्रदेश

(Image Credit : www.holidify.com)

हिवाळ्यात हिमाचल प्रदेशचा नजारा काही औरच असतो. हिमाचलमध्ये निसर्गाने अशी काही कमाल करुन ठेवली आहे की, तुम्ही इतक्या थंडीतही गरम पाण्याच्या नैसर्गिक स्त्रोतांमध्ये आंघोळ करण्यासाठी उडी माराल. शिमलापासून ५६ किमी आणि कालकापासून  ११० किमी अंतरावर एक छोटं ठिकाण आहे. या ठिकाणाला तातापानी म्हणतात. हे गरम पाण्याचे स्त्रोत मेडिशनल व्हॅल्यूजसाठी आहेत. हे ठिकाण आपल्या वेगळ्या वातावरणामुळे उत्तर भारतात वेलनेस हॉलिडेसाठी एक चांगला पर्याय म्हणून समोर आलं आहे. त्यामुळे आता आयुर्वेद आणि पंचकर्मासाठी केरळला जाण्याची गरज नाही. इथे आंघोळ करुन अनेक आजारांपासून सुटका होऊ शकते असे म्हटले जाते. त्यामुळे लोक दूरदूरुन इथे आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठ येतात. 

तीर्थन व्हॅली, हिमाचल प्रदेश

(Image Credit : traveltriangle.com)

द ग्रेट हिमालयन नॅशनल पार्कच्या आजूबाजूला अनेक सुंदर डोंगर आहेत. या ठिकाणी तुम्ही तुमची सुट्टी पूर्णपणे एन्जॉय करु शकता. अशीच एक व्हॅली तीर्थन व्हॅली आहे. हे ठिकाण तीर्थन नदीच्या किनारी आहे. इथे काही दिवस राहून तुम्ही हिमाचल प्रदेशच्या सौंदर्याचा आनंद घेऊ शकता. स्थानिक लोकांनी इथे पर्यटकांसाठी कॉटेज तयार केले आहेत. या लोकांकडूनच जंगलाच्या मधोमध कोणत्याही मोठ्या हॉटेलप्रमाणे सुविधा दिल्या जातात. हे कॉटेज पारंपारिक पद्धतीने तयार करण्यात आले आहेत. तसेच इथे तुम्ही मोकळ्या आकाशाखालीही कॅम्प लावून राहू शकता. हे कॅम्प आधुनिक सुविधा असलेले असतील. यासोबतच तीर्थन व्हॅलीमध्ये तुम्ही ट्रॅकिंगचाही भरपूर आनंद घेऊ शकता. तसेच नदीमध्ये तुम्ही फिशिंगचाही आनंद घेऊ शकता.  

टॅग्स :tourismपर्यटनHimachal Pradeshहिमाचल प्रदेशJammu Kashmirजम्मू-काश्मीर