सिग्नल बिघाड
By Admin | Updated: April 10, 2015 23:29 IST2015-04-10T23:29:57+5:302015-04-10T23:29:57+5:30

सिग्नल बिघाड
>सिग्नल बिघाडपश्चिम आणि मध्य रेल्वेचा बोर्याप्रवाशांना मनस्तापमुंबई - उपनगरीय रेल्वे मार्गावर बिघाडाची परंपरा सुरुच असून त्यामुळे प्रवाशांना मोठा फटका बसत आहे. शुक्रवारी सकाळी पश्चिम रेल्वे मार्गावर आणि दुपारी मध्य रेल्वे मार्गावर सिग्नल बिघाड झाला आणि या बिघाडाने प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. या दोन्ही मार्गांवरील लोकल वीस मिनिटे उशिराने धावत होत्या. सकाळी सव्वा नऊच्या सुमारास अंधेरी ते जोगेश्वरी दरम्यान अप धीम्या मार्गावर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आणि या बिघाडाने कामावर जाणार्या चाकरमान्यांचे चांगलेच हाल केले. बिघाडाची माहीती मिळताच पश्चिम रेल्वेच्या तांत्रिक कर्मचार्यांनी सिग्नल यंत्रणा दुरुस्तीचे काम हाती घेतले. तोपर्यंत अप धीम्या मार्गावरील लोकल अप जलद मार्गावर वळविण्यात आल्या. त्याचा फटका आणखीणच बसत गेल्याने लोकल वीस मिनिटे उशिराने धावू लागल्या. त्यामुळे चर्चगेटच्या दिशेने जाणार्या सर्वच स्थानकांवर प्रवाशांची तुडुंब गर्दी झाली. अनेक प्रवासी लोकलची प्रतिक्षा करताना दिसत होते. सिग्नल यंत्रणेतील बिघाड अर्धा तासात दुरुस्त करण्यात आल्यानंतर अप धीमा मार्ग पुर्ववत करण्यात आला. मात्र या बिघाडामुळे दुपारपर्यंत पश्चिम रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीतच राहिले. या बिघाडाने प्रवासी हैराण झालेले असतानाच दुपारी ३.३५ च्या सुमारास मुलुंड स्थानकाजवळील अप जलद मार्गावरही सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आणि जलद मार्गावरील प्रवाशांचा प्रवास चांगलाच रखडला. सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्तीचे काम हाती घेण्यासाठी चारही मार्गावरील सिग्नल यंत्रणा बंद ठेवण्यात आली आणि त्याचा फटका सर्वच मार्गावरील लोकल सेवांना बसला. त्यामुळे लोकल वीस मिनिटे उशिराने धावत होत्या, असे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले. हा बिघाड त्वरीत दुरुस्त करण्यात आल्यानंतर सायंकाळी चारच्या सुमारास लोकल सेवा पुर्ववत करण्यात आला. पंरतु या घटनेमुळे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीतच होती. दोन्ही मार्गांवरील घटनेत लोकल रद्द झाल्या नसल्याचे सांगण्यात आले.