प्रज्ञा : नादुरुस्त बसमुळे आदिवासी प्रवाशांना मनस्ताप अपघाताची शक्यता : सुस्थितीतील बसची मागणी
By Admin | Updated: August 11, 2015 22:11 IST2015-08-11T22:11:36+5:302015-08-11T22:11:36+5:30
मढ : अतिदुर्गम आदिवासी भागात सुस्थितीतीलच एसटी बस पाठवाव्यात, अशी मागणी आदिवासी जनतेतून होत आहे.

प्रज्ञा : नादुरुस्त बसमुळे आदिवासी प्रवाशांना मनस्ताप अपघाताची शक्यता : सुस्थितीतील बसची मागणी
म : अतिदुर्गम आदिवासी भागात सुस्थितीतीलच एसटी बस पाठवाव्यात, अशी मागणी आदिवासी जनतेतून होत आहे.ओतूर, कोपरे एसटी बस (क्र. एमएच १२ सीएच ७००६) ही उदापूर गावाजवळ नादुरुस्त झाल्यामुळे प्रवाशांना काही काळ मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे एसटी बसच्या कारभाराबद्दल प्रवासी व नागरिकांनी नाराजी व्यक्तकेली आहे. या मार्गावर सुस्थितीतील बसच पाठवाव्यात, अशी मागणी या वेळी प्रवासी व नागरिकांनी केली.जुन्नर तालुक्यातील अतिदुर्गम डोंगराळ भागात वसलेल्या आदिवासी गावांपैकी कोपरे, मांडवे, मुथाळणे, पुताची वाडी, तसेच इतर वाड्यावस्त्यांवर ये-जा करण्यासाठी एसटी बस हाच मुख्य आधार आहे. शिवाय, ओतूर, उदापूर व मांदारणे, मुथाळणे घाट, मुथाळणे, पुताची वाडी, माडवे फाटा, कोपरे, असा साधारणत: वीस ते पंचवीस किमीचा हा मार्ग अतिशय अवघड वळणाचा, उंच चढणीचा, खोल दरी असलेला असा आहे. याच मार्गावर चार किमीचा अतिशय अवघड मुथाळणे घाटही आहे. मुथाळणे घाट संपल्यानंतरही हा मार्ग अवघड वळणाचा खडतर असून, येथे नेहमीच अपघाताची शक्यता असते.नादुरुस्त, कालबा एसटी बस या मार्गावर पाठवण्यात आल्या, तर प्रवाशांचा जीव धोक्यात घातला जात असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. या एसटी बसला उदापूरऐवजी मुथाळणे घाटात तांत्रिक बिघाड झाला असता, तर मोठा अपघात होऊ शकला असता. त्यामुळे ओतूर, कोपरे या मार्गावर सुस्थितीतीलच बस पाठवाव्यात, अशी मागणी या परिसरातील आदिवासी जनता करीत आहे.फोटो : उदापूर येथे ओतूर, कोपरे बस स्टेअरिंग ऑईलचा पाईप फुटल्यामुळे बंद अवस्थेत उभी.