ऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 02:55 PM2018-11-17T14:55:02+5:302018-11-17T15:01:43+5:30

अनेकजण देशातील ठिकाणांपेक्षा फिरायला जाण्यासाठी परदेशातील ठिकाणांना अधिक प्राधान्य देतात.

Prague is perfect destination for Europe trip! | ऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन!

ऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन!

Next

अनेकजण देशातील ठिकाणांपेक्षा फिरायला जाण्यासाठी परदेशातील ठिकाणांना अधिक प्राधान्य देतात. तुम्हीही असाच काही परदेशीत फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी एका खास शहराची खासियत घेऊन आलो आहोत. आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत चेक रिपब्लिकची राजधानी असलेल्या प्राग शहराबाबत. जगातल्या अनेक सुंदर शहरांमध्ये प्राग शहराचं नाव घेतलं जातं. आधुनिक इमारतींसोबतच या शहरात जुन्या इमारतीही बघायला मिळतात. या शहरात तुम्ही क्रूज, ट्रेडीशनल फूड, प्राग कॅसल, द जॉन लेनन वॉल आणि चार्ल्स ब्रिजचाही आनंद घेऊ शकता. 

यूरोपमधील चेक रिपब्लिकमधील प्राग हे शहर आपल्या भव्यतेसाठी आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीसाठी पर्यटकांमध्ये चांगलंच लोकप्रिय आहे. दरवर्षी इथे साधारण ४० लाख पर्यटक भेट देतात. कारण इथे फिरण्यासोबतच अनेक वेगवेगळ्या गोष्टी करण्याची आणि त्याची सहभागी होण्याची संधी पर्यटकांना देतं. 

(Image Credit : www.busabout.com)

शिल्पकला, कलाकृती, शांत हिरव्यागार बागा, देशी बिअर, वेगवेगळे खाद्यपदार्थ आणि शॉपिंग या सर्वांना आनंद तुम्ही प्राग शहरात घेऊ शकता. इथे ऐतिहासिक महलांसोबतच, इमारती आणि चर्चही मोठ्या प्रमाणात आहेत. एकापेक्षा एक सुंदर इमारती आणि कलाकृती इथे बघण्यात वेगळीच मजा येते. इतिहासाची आणि ऐतिहासिक वस्तूंची आवड असणाऱ्यांसाठी हे शहर फारच चांगला पर्याय ठरेल. 

चार्ल्स ब्रिजचा नजारा

वाल्टवा नदीला ओल्ड टाऊन आणि लेसर टाऊन चार्ल्स ब्रिजच्या माध्यमातून जोडलं जातं. प्रागमधील किल्ल्यांवर लागणारे लाईट्स रात्री या ब्रिजवरुन पाहण्यात एक वेगळीच मजा आहे. 

प्रागमधील किल्ल्याचं सौंदर्य

हा किल्ला शहरातील सर्वात उंच ठिकाणावर आहे. शतकानुशतके ही इमारत आहे तशीच उभी आहे. यात शाही महल, कॅथेड्रल, चर्च, मठ, टॉवर, घोड्यांचा क्लब आणि नक्शीदार गल्ल्या बघायला मिळतील.

१) ६०० वर्ष जुन्या चार्ल्स ब्रिजहून तुम्ही सूर्योदय आणि सूर्यास्ताचा सुंदर नजारा बघू शकता. 

२) ११ व्या शतकात उभारलेला पावडर टॉवर जो प्रागचा प्रवेश द्वार आहे. याचा उपयोग १७व्या शतकात गन पावडर स्टोर म्हणून केला जात होता. त्यामुळे याचं नाव पावडर टॉवर पडलं आहे. 

३) ओल्ड न्यूसिनागॉगे नावाची ही जागा एक यहूदी क्वॉर्टर असून हे यूरोपमधील सर्वात जुनं उपासना केंद्र आहे. 
 

Web Title: Prague is perfect destination for Europe trip!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :tourismपर्यटन