आजपासून वसई रोड-दिवा-रोहा विभागात नविन डेमू ट्रेन
By Admin | Updated: December 12, 2014 23:49 IST2014-12-12T23:49:16+5:302014-12-12T23:49:16+5:30
आजपासून वसई रोड-दिवा-रोहा विभागात नविन डेमू ट्रेन

आजपासून वसई रोड-दिवा-रोहा विभागात नविन डेमू ट्रेन
आ पासून वसई रोड-दिवा-रोहा विभागात नविन डेमू ट्रेनरेल्वेमंत्री सुरेश प्रभू दाखवणार हिरवा झेंडामुंबई - रेल्वे अर्थसंकल्पात घोषित झालेल्या नविन गाड्या सुरु करण्यावर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडून भर दिला जात आहे. अर्थसंकल्पातच घोषित झालेल्या वसई रोड-दिवा-रोहा विभागासाठीच्या दोन नविन डेमू ट्रेनला रेल्वेमंत्र्यांकडून शनिवारी हिरवा कंदील दाखवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आणखी तीन नविन गाड्यांनाही हिरवा कंदील दाखवतानाच दोन नविन गाड्यांची घोषणाही केली जाणार आहे. सध्या दिवा-वसई आणि रोहा मार्गावर डिझेल मल्टिपल युनिट (डेमू) ट्रेन धावत आहेत. मात्र या ट्रेन फारच जुन्या असण्याबरोबरच त्यांचा वेगही कमी होता. त्यामुळे या मार्गावर नविन ट्रेन आणावी अशी मागणी होत होती. त्यानुसार दोन नविन डिझेल इलेक्ट्रीक मल्टिपल युनिट (डेमू) ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या ट्रेनला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते लोकमान्य टिळक टर्मिनस येथून शनिवारी संध्याकाळी साडे चार वाजता हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. त्याचबरोबर ११0५३ एलटीटी-आजमगड विकली एक्सप्रेस, पश्चिम रेल्वेची २२९३३ बान्द्रा टर्मिनस ते जयपूर विकली सुपरफास्ट एक्सप्रेस, १९0२१ बान्द्रा टर्मिनस ते लखनौ विकली सुपरफास्ट एक्सप्रेसलाही हिरवा झेंडा दाखवण्यात येणार असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. त्याचबरोबर ११0७३ एलटीटी-चैन्नई विकली एक्सप्रेस आणि २२११५ एलटीटी-करमाळी विकली एसी एक्सप्रेसची घोषणा केली जाणार आहे. ..........................................११0७३ चैन्नई विकली एक्सप्रेस ट्रेन १५ डिसेंबरपासून तर २२११५ करमाळी विकली एक्सप्रेस ट्रेन १८ डिसेंबरपासून धावणार आहेत. ......................................