No traffic police need to be paid on Sigal: Amit Kale | सिग्लवर एकही वाहतूक पोलीस देण्याची गरज पडू नये : अमित काळे
सिग्लवर एकही वाहतूक पोलीस देण्याची गरज पडू नये : अमित काळे

ठळक मुद्देसिग्लवर एकही वाहतूक पोलीस देण्याची गरज पडू नये : अमित काळेठाणे शहर व परिसरातील वाहतूक या विषयावर मार्गदर्शन वाहतूकीचे नियम नागरिकांनी स्वत:हून पाळले पाहिजे : अमित काळे

ठाणे : वाहतूकीचे नियम नागरिकांनी स्वत:हून पाळले पाहिजे. सिग्लवर एकही वाहतूक पोलीस देण्याची गरज पडू नये. सिग्नल लागल्यावर वाहनचालकांनी स्वत:हून थांबले पाहिजे. मी आधी जाईल यापेक्षा दुस:यांना आधी जायला सांगावे आणि सिग्नल सुटल्यावर ही भावना प्रत्येकात असेल तर वाहतूक कोंडी होणार नाही. तुमचा जीव मूल्यवान आहे, त्याची काळजी तुम्ही स्वत:हूनच घेतली पाहिजे असा सल्ला वाहतूक नियंत्रण विभागाचे उपायुक्त अमित काळे यांनी दिला.
      रोटरी क्लब ऑफ ठाणोच्यावतीने सहयोग मंदिर येथे मंगळवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ठाणे शहर व परिसरातील वाहतूक या विषयावर काळे यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, सुव्यवस्थित वाहतूक होण्यासाठी लोकसहभाग अत्यंत आवश्यक आहे. भारतात दरवर्षी दीड लाख अपघाती मृत्यू होत आहे आणि ठाण्यात दरवर्षी 200 ते 250 रस्त्यावरचे अपघातात मृत्यू होतात. दुर्लक्षपणो जलद वाहतूक चालविल्याने, वाहतूकीच्या नियमांचे पालन न केल्यास, सिग्नल तोडल्याने अपघाती मृत्यू होतात. चुकीच्या दिशेने वाहतूक चालविण्याचा प्रकार भिवंडी, कल्याणमध्ये प्रामुख्याने दिसून येतो. वाहतूकीच्या नियमांचे भंग करणा:या वाहनचालकाला पकडल्यास सुरूवातीला ते वाहतूक पोलीसांचे वाद करतात. मग ओळखीच्यांना फोन करण्याचे प्रकार सुरू होतात. आता आमच्या वाहतूक पोलीसांनी कोणाचेही फोन घेणो बंद केले आहे. आता 1क् पैकी 1क् वाहनचालक सिटबेल्ट लावतात तर 1क् पेकी 9 वाहनचालक हेल्मेट घालत असल्याचे दिसून येत आहे. 50 टक्क्यांपेक्षा जास्त अपघात हे इतर रोडवर जास्त होतात. पादचारी चालताना वाहने पाहत नाही, कानात हेडफोन लावून चालतात. 50 टक्के पेक्षा अधिक अपघात हे दुचाकींचे होतात ते ही केवळ हेल्मेट न घातल्याने होत असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. ज्यावेळी एखाद्या नियमाची अंमलबजावणी करतो तेव्हा ते नियमांचे पालन करणो आवश्यक असते. दोन टक्के वाहनचालक नियम पाळत नाही 98 टक्के वाहन चालक नियम पाळतात असे चित्र दिसण्याऐवजी 98 टक्के वाहनचालक नियम मोडतात आणि केवळ दोन टक्केच वाहनचालक नियम पाळतात. शासनाने दंडाची रक्कम वाझवली तेव्हा त्या रक्कमेची तुलना रस्त्यांवरील खड्डे, आणि वाहतूक कोंडीशी केली जाऊ लागली. प्रत्यक्षात हे दोन्ही विषय वेगळे आहेत. परंतू वाहनचालकांनी नियम पाळले तर दंड भरण्याची आवश्यकताच भासणार नाही. वाहतूक पोलीस वाहतूक कोंडी सोडविण्याबरोबर वाहतूक नियमांची जागृतीही करत आहेत. विद्यार्थीदशेतच मुलांना वाहतूकीचे नियम आणि ते नियम मोडल्यावर होणा:या दुष्परिणामांची जाणीव करुन दिले तर घरातील वाहन चालविणारी मोठी मंडळी हे नियम निश्चितच पाळतील अशी अपेक्षा काळे यांनी व्यक्त केली. यावेळी रोटरी क्लब ऑफ ठाणोचे अध्यक्ष अच्युत दामले आणि सेक्रेटरी श्रीकांत तन्ना उपस्थित होते. 

Web Title: No traffic police need to be paid on Sigal: Amit Kale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.