पनवेलमध्ये नो पार्किंग धोरण महत्वाच्या २५ ठिकाणी मनाई : १५ स्पॉटवर एक बाजुने परवानगी
By Admin | Updated: August 20, 2015 22:10 IST2015-08-20T22:10:10+5:302015-08-20T22:10:10+5:30
पनवेल : पेठांचे शहर आणि तालुक्याचे ठिकाण असलेल्या पनवेलमध्ये वाहनांची नेहमीच वर्दळ असते. अरुंद रस्ते आणि पार्किंग व्यवस्थेचा अभाव यामुळे वाहतुक कोंडी ही नेहमीचीच समस्या झाली आहे. यावर उपाय म्हणून पनवेल नगरपरीषद व वाहतूक पोलिसांनी शहरातील महत्वाची २५ ठिकाणी नो पार्किंग क्षेत्र म्हणून जाहीर केली आहेत. त्यामुळे वाहतुक कोंडीला लगाम बसणार असल्याचा विश्वास दोन्ही विभागांकडून व्यक्त करण्यात येत आहे .

पनवेलमध्ये नो पार्किंग धोरण महत्वाच्या २५ ठिकाणी मनाई : १५ स्पॉटवर एक बाजुने परवानगी
प वेल : पेठांचे शहर आणि तालुक्याचे ठिकाण असलेल्या पनवेलमध्ये वाहनांची नेहमीच वर्दळ असते. अरुंद रस्ते आणि पार्किंग व्यवस्थेचा अभाव यामुळे वाहतुक कोंडी ही नेहमीचीच समस्या झाली आहे. यावर उपाय म्हणून पनवेल नगरपरीषद व वाहतूक पोलिसांनी शहरातील महत्वाची २५ ठिकाणी नो पार्किंग क्षेत्र म्हणून जाहीर केली आहेत. त्यामुळे वाहतुक कोंडीला लगाम बसणार असल्याचा विश्वास दोन्ही विभागांकडून व्यक्त करण्यात येत आहे . पनवेलमध्ये अनेक मोठी दुकाने आणि मॉल्स उभे राहत आहेत. त्यामुळे ग्राहकांची सतत वर्दळ असते. ते मनमानीपणे रस्त्यावर गाड्या पार्क करतात. कापड व झवेरी बाजारात सतत वर्दळ असते. शहरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. जुन्या इमारतींची पुनर्बांधणीही होत आहे. नव्या इमारती बांधताना बांधकाम व्यावसायिक पार्किंगसाठी जागा ठेवतात, मात्र त्याबदल्यात घर घेणार्यांकडून लाखो रुपये वसूल करतात. हे टाळण्यासाठी अनेजण पार्किंगसाठी जागा घेत नाहीत आणि वाहने इतरत्र पार्क करतात. शहरात आजही अनेक सोसायट्यांमध्ये पार्किंगची सुविधाच नाही. त्यामुळे अनेक सोसायट्यांमध्ये पार्किंगवरून खटके उडतात. दीडशे वर्ष जुन्या नगरपरीषदेने अद्याप वाहतुकीच्या दृष्टीने योग्य नियोजन केलेलेच नाही. बांधकाम परवाना व भोगवटा प्रमाणपत्र देताना बांधकाम व्यावसायिकांना पार्किंगसाठी जागा सोडणे बांधकाम विभागाने बंधनकारक केलेले नाही. याबाबत सामाजिक संघटना आणि प्रसिध्दीमाध्यमांनी जोरदार आवाज उठवला. याची दखल पालिका प्रशासनाने घेतली. पार्किंग धोरण ठरवण्याचा निर्णय घेण्यात येऊनही एजन्सीच मिळत नव्हती. त्यामुळे पालिका प्रशासन व वाहतूक पोलिसांनी संयुक्त सर्वे करून नो पार्किंग आणि वन साईड पार्किंगची ठिकाणे निश्चित केली आहेत. (प्रतिनिधी)