शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

मादाम तुसॉं बघायचंय मग लंडनचं तिकिट नको आपल्या दिल्लीचं बुक करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 5:57 PM

लंडनच्या मादाम तुसाँच्या धर्तीवरच हे म्युझियम दिल्लीत सुरु झालंय. याआधी हे म्युझियम केवळ शनिवार आणि रविवारीच पाहता यायचं. आता त्याचं अधिकृत उद्घाटन झाल्यानंतर मात्र पर्यटकांना ही सफर नेहमी करता येणार आहे. दिल्लीत आल्यावर या म्युझियमला भेट द्यायचं प्लॅनिंग करणार असाल तर त्या या संग्रहालयाविषयीची थोडीफार माहिती असायलाच हवी.

ठळक मुद्दे* दिल्लीतल्या कॅनॉट प्लेसमध्ये जुन्या रिगल थिएटरच्या जागेवर हे संग्रहालय उभारण्यात आलंय. या संग्रहालयाला हेरिटेज, पार्टी, म्युझिक आणि स्पोर्टस अशा वेगवेगळ्या झोनमध्ये विभागण्यात आलंय.* 18 वर्षांवरील व्यक्तींसाठी 960रु पये तर लहान मुलांसाठी 760 रु पये असं या संग्रहालयाचं तिकीट असणार आहे. या म्युझियमचं तिकीट आॅनलाइन बुक केलंत तर त्यावर 100 रु पयांची सूटही मिळणार आहे.भारतीय सेलिब्रिटींसोबतच काही आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींचे पुतळेही दिल्लीतल्या म्युझियममध्ये पाहायला मिळतील.

- अमृता कदममादाम तुसाँ या जगप्रसिद्ध संग्रहालयाचं नाव तुम्ही ऐकलं असेलच. जगातल्या अनेक नामांकित व्यक्तींचे मेणाचे हुबेहुब पुतळे या ठिकाणी साकारलेले आहेत. चेहरे आणि मुखवट्यांचा हा अस्सल अनुभव आपल्याला थक्क करु न जातो. पण आता त्यासाठी अगदी लंडन, अमेरिकेपर्यंत जायची गरज नाही. कारण देशाची राजधानी दिल्लीत आता ‘मादाम तुसाँ म्युझियम सुरु झालं आहे. 1 डिसेंबरपासून या म्युझियमचं अधिकृत उद्घाटन झालं आहे.

 

लंडनच्या मादाम तुसाँच्या धर्तीवरच हे म्युझियम दिल्लीत सुरु झालंय. याआधी हे म्युझियम केवळ शनिवार आणि रविवारीच पाहता यायचं. आता त्याचं अधिकृत उद्घाटन झाल्यानंतर मात्र पर्यटकांना ही सफर नेहमी करता येणार आहे. दिल्लीत आल्यावर या म्युझियमला भेट द्यायचं प्लॅनिंग करणार असाल तर त्या या संग्रहालयाविषयीची थोडीफार माहिती असायलाच हवी.भारतातल्या विविध क्षेत्रातल्या सेलिब्रेटींचे पुतळे या ठिकाणी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, बिग बी अमिताभ बच्चन, शाहरूख खान, ऋतिक रोशन, माधुरी दीक्षित, कपिल देव, सचिन तेंडुलकर, आशा भोसले आणि मिल्खा सिंह यांच्यासह अनेकांचा यात समावेश आहे.भारतीय सेलिब्रिटींसोबतच काही आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींचे पुतळेही दिल्लीतल्या म्युझियममध्ये पाहायला मिळतील. हॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री मर्लिन मन्रो, अँजेलिना जोली, फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आणि डेव्हिड बॅकहेम यांच्यासह अनेक स्टार सेलिब्रेटींचे पुतळे याठिकाणी आहेत. दिल्लीतल्या कॅनॉट प्लेसमध्ये जुन्या रिगल थिएटरच्या जागेवर हे संग्रहालय उभारण्यात आलंय. या संग्रहालयाला हेरिटेज, पार्टी, म्युझिक आणि स्पोर्टस अशा वेगवेगळ्या झोनमध्ये विभागण्यात आलंय.

 

तिकिटाचं काय?

18 वर्षांवरील व्यक्तींसाठी 960रु पये तर लहान मुलांसाठी 760 रु पये असं या संग्रहालयाचं तिकीट असणार आहे. या म्युझियमचं तिकीट आॅनलाइन बुक केलंत तर त्यावर 100 रु पयांची सूटही तुम्हाला मिळणार आहे. शिवाय तुम्हाला अ‍ॅडव्हान्स बुकिंग करण्याची संधीही आता उपलब्ध करून देण्यात आली आहे. फॅमिली आणि ग्रूप तिकीटांमध्ये तुम्हाला काही सवलतही मिळू शकते. फक्त एक लक्षात ठेवा की दिल्लीतल्या मादाम तुसाँ म्युझियममध्ये दिवसाला चारशेच लोक भेट देऊ शकतील अशी मर्यादा ठेवण्यात आलीय. सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 7.30 वाजेपर्यंत हे म्युझियम सुरु राहणार आहे. दिल्लीतल्या राजीव चौक मेट्रो स्टेशनपासून अगदी पायी चालत जाऊ शकाल इतक्या अंतरावर हे म्युझियम आहे.दिल्लीत संसद, राष्ट्रपती भवन, राजपथ या दिल्लीमधल्या आकर्षणांसोबतच लाल किल्ला,कुतूबमिनार, हुमायूनचा मकबरा अशा ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी अनेक गोष्टींसाठी पर्यटक येत असतात. या यादीत मादाम तुसाँ संग्रहालयाच्या निमित्तानं आता नव्या आकर्षणकेंद्राची भर पडलीय.