शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
3
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
4
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
5
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
6
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
7
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
8
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
9
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
10
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
11
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
12
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
13
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

इंडो-बांग्लादेश क्रूझने करा यूनेस्को वर्ल्ड हेरिटेजची सफर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 11:27 AM

बांग्लादेशची सफर करण्याची इच्छा असेल तर तुम्ही आता या प्रवासाचा आनंद क्रूझने घेऊ शकता.

(Image Credit : CruiseMapper)

बांग्लादेशची सफर करण्याची इच्छा असेल तर तुम्ही आता या प्रवासाचा आनंद क्रूझने घेऊ शकता. नुकतीच इंडो-बांग्लादेश रिव्हर क्रूझने बांग्लादेश ते कोलकाता असा प्रवास सुरू करण्यात आला आहे. दोन्हीं  देशांमध्ये हा क्रूझ प्रवास ब्रम्हपुत्रा नदीवर सुरू झाला आहे. दोन्ही देशांमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी कोलकाता आणि गुवाहाटी दरम्यान बांग्लादेशची राजधानी ढाका अशी की क्रूझ सेवा सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. या देशात कार्गोची एक यशस्वी ट्रायलही घेण्यात आली आहे. म्हणजे लवकरच तुम्हाला या क्रूझवर फिरायला जायला मिळेल. 

(Image Credit : TripAdvisor)

क्रूझ शिप एमव्ही महाबाहु २९ एप्रिलला ३० प्रवाशांसोबत १७ दिवसांच्या टूरला निघाली आहे. यात ९ देशांचे पर्यटक आहेत. एमव्ही बाहुबलीने आपला प्रवास आसामच्या पांडू या बंदरातून सुरू केला. आसाम ते ढाका असा प्रवास करत क्रूझ कोलकाताला पोहोचेल. या क्रूझवर असलेले पर्यटक यूनेस्कोच्या हेरिटेज यादीतील अनेक ठिकाणांना भेट देतील. यात आसामचं मानस नॅशनल पार्क, बांग्लादेशचं बागेरहाट मशिद शहर आणि सुंदबनसारख्या ठिकाणांचा समावेश आहे.  

(Image Credit : Brahmaputra River Cruise)

एमव्ही महाबाहु क्रूझच्या डायरेक्टर नीना मोरादा यांनी सांगितले की, या प्रवासावर निघणाऱ्या प्रवाशांना आसाम, बांग्लादेश आणि पश्चिम बंगालच्या दक्षिण भागाला बघायचा संधी मिळेल. या प्रवासात पर्यटकांना अनेक ऑफबीट ठिकाणे बघता येणार आहेत.  

(Image Credit : Deccan Herald)

प्रवासी या टूर दरम्यान अनेक रोमांचक अॅक्टिव्हिटी एन्जॉय करू शकतात. आसामच्या मानस नॅशनल पार्कमध्ये एलिफंट आणि जीप सफारीचा आनंद ते घेऊ शकतात. या पार्कमध्ये ५५ पेक्षा अधिक प्राण्यांसोबत ४२० पक्ष्यांच्या वेगवेगळ्या प्रजाती बघायला मिळतील. तसेच इथे बंगाल टायगर, कॅप्ड लॅंपर, वॉटर बफेलो असे अनेक प्राणी बघायला मिळतील. एकूण १२५० किलोमीटरच्या या प्रवासात पर्यटकांना सुंदरबनची सुंदरता न्याहाळता येणार आहे. 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटन