स्वत:सोबत आणि स्वत:साठी थोडं जगायचय मग मस्तपैकी एकट्यानं भटकून या! लोकं प्रश्न विचारतील पण उत्तरंही तयार ठेवा!
By Admin | Updated: May 26, 2017 17:47 IST2017-05-26T17:47:01+5:302017-05-26T17:47:01+5:30
सोलो ट्रीप किंवा एकट्यानंच अगदी लांबच्या ठिकाणी प्रवासाला निघणं ही काही आता नवलाईची गोष्ट राहिलेली नाही.तुम्हीही करून बघा !

स्वत:सोबत आणि स्वत:साठी थोडं जगायचय मग मस्तपैकी एकट्यानं भटकून या! लोकं प्रश्न विचारतील पण उत्तरंही तयार ठेवा!
- अमृता कदम
फिरायला जायचं म्हटलं की सुट्टयांचं नियोजन, तिकीटाचं बुकिंग, हॉटेल बुकिंग अशा एक ना अनेक गोष्टींचं काटेकोर नियोजन केलं जातं. पण असं कोणतंही प्लॅनिंग न करता, मस्तपैकी भटकायची लहर आल्यामुळे पाठीवर बॅगपॅक टाकून अगदी अडनिडं ठिकाण गाठणारे मस्तमौला भटकेही असतात. सोलो ट्रीप किंवा एकट्यानंच अगदी लांबच्या ठिकाणी प्रवासाला निघणं ही काही आता नवलाईची गोष्ट राहिलेली नाही. पण तरीही अशा भटक्यांना लोकांच्या अनेक प्रश्नांना आणि चौकशांना सामोरं जावं लागंत. तुम्ही जर असेच प्रवासवेडे असाल तर तुम्हाला विचारल्या जाणाऱ्या काही कॉमन प्रश्नांसाठी तयारीत राहिलेलं चांगलं!