मधुचंद्रासाठी भारतीय कपल्स ‘या’ ठिकाणांना देतात अधिक पसंती !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2017 16:33 IST
विशेष म्हणजे भारतीय सेलिब्रिटीदेखील याच ठिकाणी जाणे पसंत करतात, जाणून घ्या त्या ठिकाणांबाबत...!
मधुचंद्रासाठी भारतीय कपल्स ‘या’ ठिकाणांना देतात अधिक पसंती !
दिवसेंदिवस भारतात मधुचंद्रासाठी बाहेर जाण्याची क्रेझ वाढतच आहे. यात भारतीय कपल्सची सर्वाधिक पसंती म्हणजे बाली इंडोनेशिया द्वीपला अधिक पसंती मिळत असल्याचे एका सर्वेक्षणात आढळले आहे. विशेष म्हणजे भारतीय सेलिब्रिटीदेखील याच ठिकाणी जाणे पसंत करतात. ईजीगो डॉट कॉमच्या सर्वेक्षणानुसार भारतीय कपल्स मधुचंद्रासाठी समुद्र किनारे असलेले ठिकाणे अधिक पसंत करीत आहेत. विशेष म्हणजे ज्याठिकाणी ‘अराव्हल टू व्हिजा’ ही सुविधा उपलब्ध आहे, अशा ठिकाणी अधिक जाणे पसंत करतात. लग्नसोहळ्यात परिवारातील सर्व सदस्ये उपस्थित असतात, मात्र मधुचंद्र हा व्यक्तिगत विषय असल्याने त्यासाठी बहुतेक कपल्स एक किंवा सहा महिन्याअगोदर स्वत:च प्लॅनिंग करतात. सर्वेक्षणानुसार इतर ठिकाणांपेक्षा भारतीय कपल्स बाली इंडोनेशिया या ठिकाणला अधिकच पसंती देतात, कारण याठिकाणी रेताळ समुद्र किनारे आणि आकर्षक नयनरम्य दृष्यांसोबतच अराव्हल टू व्हिजाची सुविधा उपलब्ध आहे. शिवाय याठिकाणी थेट फ्लाइटच्या वाढीव पयार्यामुळे, लोक यास अधिक पसंत करत असल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्वेक्षणासाठी आॅनलाइन सर्चचाही आधार घेण्यात आला आहे. पहिल्या क्रमाकांची पसंती बाली इंडोनेशिया असली तरी त्यापाठोपाठ यूनान, पॅरिस आणि सेशेल्स याठिकाणांचाही समोवश आहे. या ठिकाणीदेखील नयनरम्य नैसर्गिक सौंदर्य तसेच आकर्षक समुद्र किनारे असून भारतीय कपल्स मधुचंद्रासाठी याठिकाणी जाणे पसंत करतात.