शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
4
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
5
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
6
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
7
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
8
"ही कुणाची चप्पल घातलीस?" आईने बदललेली चप्पल विचारताच गतिमंद मुलीने सांगितला झालेल्या अत्याचाराचा थरार !
9
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
10
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
11
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
12
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
13
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
14
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
15
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
16
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
17
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
18
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
19
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
20
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा

तब्बल २ हजार वर्ष जुन्या किल्ल्यात दडलेेले रहस्य माहीत आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 17:45 IST

भारतात पाहायला गेलं तर एकपेक्षा एक ऐतिहासिक आणि लोकप्रिय असे किल्ले आहेत.

(image credit-catch.news)

भारतात पाहायला गेलं तर एकापेक्षा एक ऐतिहासिक आणि लोकप्रिय असे किल्ले आहेत. काही किेल्ले असे आहेत ज्या किल्ल्यांच्या मागे् काही रहस्य असतं आणि त्याची कल्पना सुद्धा  नसते. हा रहस्यमय किल्ला मध्यप्रदेशात आहे. या किल्ल्याचे नाव गडकुंडार किल्ला आहे.  

हा किल्ला मध्यप्रदेशातील कुंडार गावात आहे. झांसीपासून हा किल्ला सुमारे ७० किलोमीटर लांब आहे. गडकुंडार किल्ला हा खूपच रहस्यमय आहे. २००० वर्ष जुन्या असलेल्या या किल्ल्यात २ फ्लोअरर्सचं बेसमेंट आहे. हा ऐतिहासिक किल्ला ५ मजल्यांचा आहे. ज्यात ३ मजले जमिनीवर आणि  २ मजले जमिनी खाली आहेत. 

हा किल्ला कोणी तयार केला याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. पण इतिहासकारांच्यामते हा किल्ला १५०० ते २००० वर्ष जुना आहे. या किल्ल्यात एकदा संपूर्ण लग्नाची वरात गायब झाली होती असा समज आहे . आतापर्यंत  त्या गायब झालेल्या लोकांचा शोध लागलेला नाही. या घटनेनंतर किल्ल्याच्या तळाला जाणारे  सगळे दरवाजे बंद करण्यात आले होते. 

त्या ठिकाणच्या रहिवासीयांच्यामते वरातीतील लोकांची संख्या ५०- ६० इतकी होती. या घटनेप्रमाणेच अनेक घटना या गडकुंढार किल्ल्यामध्ये घडल्याचं समजतं. असं मानलं जातं की या किल्ल्यात मोठा खजिना आहे. स्थानिक चोरांनी या किल्ल्यातील खजिना शोधण्यासाठी खूप मेहनत घेतली. अनेकांचे जीव सुद्धा गेले. (हे पण वाचा-पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या महाराष्ट्रातील गोवळकोट किल्ल्याला एकदा नक्की द्या भेट!)

इतिहासकारांच्यामते गडकुंढार किल्ला खुप संपन्न आहे. या परिसरात चंदेल, बुंदेल आणि खंगारांचे वर्चस्व होते. या किल्ल्याच्या शासनकर्त्याकडे मोठ्या प्रमाणावर हिरे आणि दागिने असत. म्हणूनच त्यांना  दरोडेखोरांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी खजिना किल्ल्याच्या तळाला ठेवला होता. या किल्ल्याच्या आतील रस्ते खुपचं संभ्रमात टाकणारे आहे. पर्यटकांचे आकर्षण असलेला हा किल्ला आहे.  अंधारात हा किल्ला खूपच भयावह वाटत असतो. या किल्ल्याच्या इतिहासाबाबत सांगताना शोधनकर्ते  असं सांगतात की, हा किल्ला चंदेलांचे मुख्यालय आणि सैनिकांचे तळ होता. 

( हे पण वाचा- भेट देण्याआधी भारतातील कोणते बीच चांगले आणि कोणते अस्वच्छ आहेत ते जाणून घ्या!)

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्स