शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

थरारक काही करण्याचा प्लॅन असेल तर दांडेलीला आवर्जून द्या भेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 12:28 IST

वाइल्डलाईफ ट्रेकिंगपासून ते कयाकिंगपर्यंत सगळ्याच गोष्टी इथे तुम्हाला करायला मिळतात. त्यामुळे एखाद्या अ‍ॅडव्हेंचरस ट्रिपच्या शोधात असाल तर तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता.

(Image Credit : Trawell.in)

कर्नाटक हे भारतातील सर्वात सुंदर आणि नैसर्गिक संपन्न ठिकाणांपैकी एक आहे. वाइल्डलाईफ ट्रेकिंगपासून ते कयाकिंगपर्यंत सगळ्याच गोष्टी इथे तुम्हाला करायला मिळतात. त्यामुळे एखाद्या अ‍ॅडव्हेंचरस ट्रिपच्या शोधात असाल तर तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता.

आम्ही ज्या ठिकाणाबाबत तुम्हाला सांगत आहोत, ते ठिकाण आहे कर्नाटकातील दांडेली. इथे तुम्ही तुमच्या मित्रांसोबतही जाऊ शकता आणि तुम्ही एकटेही जाऊ शकता. जंगल सफारी असो वा कयाकिंग किंवा पाण्याच्या उंचच उंच लाटांवर राफ्टिंग हा भन्नाट कधीही न विसरता येणारा अनुभव तुम्ही इथेच घेऊ शकता.

जॉर्बिंग

(Image Credit : Trawell.in)

जॉर्बिंग हे ऐकायला थोडं वेगळं आणि नवीन आहे. पण अ‍ॅडव्हेंचरचे शौकीन लोकांना हे चांगलंच माहीत असणार. ही फार युनिक प्रकारची अ‍ॅक्टिव्हिटी असून याचा अनुभव तुम्ही काही मोजक्याच ठिकाणांवर घेऊन शकता. यात एका ट्रान्सपरंट बॉलच्या आत जाऊन पाण्यावर धावावं लागतं. हे वाटतं तेवढं सोपं नक्कीच नाही. पाण्यावर तरंगता बॉल आणि त्यात धावणे यात मजा नक्कीच अधिक आहे. कर्नाटकातील काली अ‍ॅडव्हेंचर कॅम्पमध्ये तुम्ही जॉर्बिंग करू शकता.

रिव्हर सफारी

दांडेलीमध्ये रिव्हर सफारी दरम्यान अनेक प्राणी-पक्षी बघण्याची संधी मिळते. कर्नाटकाच्या जंगलांमध्ये अनेकप्रकारचे सुंदर पक्षी बघायला मिळतात. तसेच इथे आल्यावर तुम्ही ओल्ड मॅगझिन हाऊसला नक्की भेट द्या. इथे सरकारी लॉज आहेत. जेथून तुम्ही जंगलाचा सुंदर नजारा बघू शकता.

व्हाइट वॉटर राफ्टिंग

(Image Credit : River Valley Lodge)

व्हाइट वॉटर राफ्टिंगचा आनंद घेण्यासाठी केवळ अ‍ॅडव्हेंचरची आवड असणं पुरेसं नाही. त्यासाठी तुम्हाला स्वीमिंग येणंही गरजेचं आहे. दांडेलीला गेल्यावर हे नक्कीच ट्राय करा. इथे यासाठी परदेशी आणि भारतीय पर्यटकांसाठी वेगवेगळे शुल्क आकारले जाते. इथे राफ्टिंग ही वातावरणानुसार सुरू असते. त्यामुळे आधी एकदा याची माहिती काढावी.

स्पाइस प्लान्टेशन टूर

(Image Credit : Media India Group)

जंगलात फिरताना, ट्रेकिंग करताना सुंगधीत मसाल्यांची झाडे बघणे आणि त्यांची माहिती घेणे हा सुद्धा एक वेगळा अनुभव ठरू शकतो. यासाठी तिथे गाइडही उपस्थित असतात.

कयाकिंग

(Image Credit : Trawell.in)

अ‍ॅडव्हेंचर ट्राय करायचं असेल पण बजेट कमी असेल तर कयाकिंग हा पर्याय सर्वात चांगला आहे. इथे तुम्ही केवळ २०० रूपयांमध्ये १ तास कयाकिंग एन्जॉय करू शकता.

जिप-लायनिंग

दांडेलीला जाऊन ही अ‍ॅक्टिव्हिटी एकदा आवर्जून ट्राय करावी अशीच आहे. यात भीती नक्कीच वाटते पण मजाही खूप येते. यात तुम्हाला हॉर्सनेसने बांधलं जातं आणि एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत हवेत लटकत जावं लागतं.

कवाला केव्ह्स हायकिंग

(Image Credit : TripAdvisor)

कवाला केव्ह्सपर्यंत हायकिंग करत जाण्याचा थरारक अनुभव नक्कीच लक्षात राहील असाच असेल. यासाठी तुम्हाला आधीच तयारी करावी लागते. इथे भारतीयांना ४५० रूपये तर परदेशी पर्यटकांनी १००० रूपये फी द्यावी लागते.

टॅग्स :Karnatakकर्नाटकtourismपर्यटनTravel Tipsट्रॅव्हल टिप्स