शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

चल बस, हे पुस्तक वाचू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2019 12:45 AM

चल बस, एक राउंड मारून येऊ! या वेगळ्या आणि काहीशा विचित्र नावाचा, लघुत्तम कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. संवेदना प्रकाशनने तो प्रकाशित केला आहे.

- नारायण लाळे

चल बस, एक राउंड मारून येऊ! या वेगळ्या आणि काहीशा विचित्र नावाचा, लघुत्तम कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. संवेदना प्रकाशनने तो प्रकाशित केला आहे. या कथासंग्रहाचे मुखपृष्ठ शैलेश सावंत-भोसले यांनी चितारले आहे. कवी भगवान निळे यांनी या कथासंग्रहाची पाठराखण केली आहे आणि कवयित्री योगिनी राऊळ यांनी, संग्रहाचे कथालेखक सुहास मळेकर यांना सुयोग्य मार्गदर्शन केले आहे. एकूण संग्रहाची निर्मिती देखणी आणि म्हणूनच उत्सुकता वाढवणारी आहे. संग्रहाचे लेखक सुहास मळेकर यांचे मनोगत संग्रहातील कथांची झलक दर्शवणारे आहे. चंद्रकांत खोत यांच्यासारख्या एका मोठ्या लेखकाचे पाठबळ या संग्रहाला लाभले आहे. ‘माझे साहित्यिक गुरू चंद्रकांत खोत’ असा आदरपूर्वक उल्लेख सुहास मळेकर यांनी त्यांच्या मनोगतात केला आहे. संग्रहातील एकूण कथांमधून ‘मी’ डोकावताना दिसेन, असे मळेकर यांनी स्पष्ट केले आहे. आत्मपर कथा म्हणूनही या कथांचा उल्लेख करता येईल. वडिलांकडून पुस्तक वाचनाची मिळालेली प्रेरणा मळेकर यांना त्यांच्या कथालेखनासाठी प्रवृत्त करणारी ठरली आणि त्याचेच हे दृश्य रूप म्हणजे, ‘चल बस, एक राउंड मारून येऊ!’ हा संग्रह वाचकांच्या हाती आला आहे.मराठी साहित्यात गद्यलेखनातील अनेक प्रकार सांगता येतील. कथा, लघुकथा, लघुत्तम कथा, दीर्घकथा, लघुकादंबरी, कादंबरी असे अनेक प्रकार असून, शिवाय ललित गद्य, स्फूट, वृत्तपत्रीय लेखन असेही गद्य लेखनाचे प्रकार आहेत. ‘चल बस, एक राउंड मारून येऊ!’मध्ये सुहास मळेकर यांचे हे स्फूटलेखन आहे, असे मला म्हणायचे आहे. या स्फूटलेखनाची प्रसिद्धी वृत्तपत्रांतून झाली असल्याचे मळेकरांनी सांगितले आहे. सुहास मळेकर यांना आणखी एक डोळा आहे! त्याला मी ‘तिसरा डोळा’ म्हणेन. म्हणजे त्यांचा कॅमेरा! या क्षेत्रातील त्यांचे अनुभव, दृश्ये, निरीक्षण त्यांनी या तिसऱ्या डोळ्याने टिपले आहे. तेच अनुभव मळेकर यांनी या स्फूटलेखांद्वारे मांडले आहेत. प्रथमदर्शनी या संग्रहाचे नाव अनोखे वाटत असले, तरी या नावाचेच एक स्फूट संग्रहात समाविष्ट आहे. ते वाचून आपण चकित होतो आणि त्याचवेळी मळेकर यांच्या स्फूटलेखनाची ताकदही वाचकांच्या लक्षात येते.सुहास मळेकर यांचे प्रत्येक स्फूट त्यांच्या अनुभवातून साकारले आहे. ‘काल्पनिक’ला त्यांनी कुठेच थारा दिलेला नाही. स्फूट लिहिताना मळेकर यांची भाषाही तितकीच ओघवती, सोपी, लहानलहान वाक्यांनी समृद्ध झालेली दिसते. संग्रहातील ‘समृद्धा’ हा लेख वाचतानाही असाच अनुभव येतो. कचरा गोळा करणारी भिकारीण, एका बाजूला विश्रांतीसाठी बसलेली आहे. तिच्या पोत्यात अनेक तुटक्याफुटक्या वस्तू. त्यात ती काहीतरी शोधून एक लहानशी बाटली बाहेर काढते. ती बाटली म्हणजे नेलपॉलीशची फेकून दिलेली बाटली असते. ती कचरा गोळा करणारी बाई स्त्रीसुलभ भावनेने नेलपेंट काढून नखं रंगवीत असते. या एकपानी स्फूटलेखातून मळेकर यांनी स्त्रीच्या मनात उपजत असलेली ‘चांगलं दिसण्याची’ भावना सांगितली आहे.‘एक काळाकुट्ट मुलगा’मधील प्रभूबार्इंची व्यक्तिरेखा एक आदर्श म्हणून समोर ठेवावी अशी आहे. या लेखामधूनदेखील मळेकर यांनी, स्वप्न देणाºया व्यक्तींबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. एक स्त्री शिक्षिका सतत मनोबल खच्ची करणारी वागणूक देते आणि एक स्त्री (प्रभूबाई) शिक्षिका सकारात्मक वागून मनोबल वाढवणारी ऊर्जा देते. या स्फूटलेखातूनही लेखक बरंच काही सांगून जातो. ‘संस्कार’ या एकपानी स्फूटलेखातूनही लेखक, संस्कार म्हणजे काय, काही संस्कारांची उकल मोठेपणी कशी होते, याचे वर्णन करतो.अनुभवातला चटका लावणारा क्षण स्फूटलेखात उतरवणं, हे लेखकाचं कसब असतं आणि तेही मोजक्याच शब्दांमधून. याच कारणास्तव स्फूटलेखनाचा वाचक मोठा आहे. वृत्तपत्रांतील रविवारच्या पुरवण्यांचं यश, यातच दडलेलं आहे, असं म्हटलं तर ते गैर ठरू नये. ‘चल बस, एक राउंड मारून येऊ’ हे पुस्तक एखाद्या वाचकाच्या हाती पडलं आणि तो म्हणाला की, ‘चल बस, आधी हे पुस्तक वाचून काढू’ तर त्याचे आश्चर्य वाटू नये. चल बस, एक राउंड मारून येऊ ! हा सुहास मळेकर लिखित काहीशा विचित्र नावाचा, लघुत्तम कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला. आत्मपर कथा म्हणूनही यातील कथांचा उल्लेख करता येईल. एकूणच हे स्फूटलेखन असून साध्या,सोप्या भाषेत आणि त्यांच्या अनुभवातून साकारलेले आहे. स्फूटलेखनाची मांडणी करताना प्रत्येक घटना मनाला चटका लावते आणि विचार करायला भाग पाडते हे नक्की. संग्रहातील प्रत्येक लेखातील सामाजिक भान असलेली लेखकाची दृष्टी, मोजक्याच शब्दांत आणि मोजक्याच जागेत केलेली लेखांची मांडणी वाचकांना सुखद ठरते. प्रत्येक लेख प्रबोधन करणारा ठरतो.चल बस, एक राउंड मारून येऊ! मध्ये ‘मी’ने त्याच्या दोन मित्रांची वृत्ती दाखवली आहे. एक गरीब मित्र त्याला मिळालेली सायकल, जुनी पुराणी वापरलेली... असे असूनही मित्र लेखकाला मोठ्या कौतुकाने, प्रेमाने, मित्रत्वाच्या नात्याने दाखवतो आणि सांगतो, चल बस, सायकलवर, तुला एक राउंड मारून आणतो... आणि एक श्रीमंत झालेला मित्र, एक कोटीचं पॅकेज मिळालेला, महागड्या कारने फिरणारा, परंतु तुच्छतेने लेखकाला कमी लेखणारा म्हणतो, ‘चल बस, माझ्या पॉश कारमध्ये, तुला एक राउंड मारून आणतो’. गरीब व त्याची वृत्ती आणि एक श्रीमंतीनं उद्दाम झालेली वृत्ती, असा मोठा पट या स्फूटलेखनातून वाचकांच्या लक्षात येतो आणि या संग्रहाच्या नावाचाही उलगडा होतो.

टॅग्स :thaneठाणे