जीवघेणे ठरत आहे रेल्वे क्रॉसिंग
By Admin | Updated: January 29, 2015 23:17 IST2015-01-29T23:17:35+5:302015-01-29T23:17:35+5:30
जीवघेणे ठरत आहे रेल्वे क्रॉसिंग

जीवघेणे ठरत आहे रेल्वे क्रॉसिंग
ज वघेणे ठरत आहे रेल्वे क्रॉसिंग -कळमना-कामठी रोड स्थित क्रॉसिंग : संतप्त नागरिकांचा आंदोलनाचा इशारा विहंग सालगटनागपूर : कामठी-कळमना रोडवरील (येरखेडा रोड) रेल्वे क्रॉसिंगचे फाटक एकवेळा बंद झाल्यावर २० मिनिटानंतरच उघडते. त्यानंतर विस्कळीत होणारी वाहतूक सुरळीत होण्यासाठी तब्बल एक तासांचा वेळ जातो. या क्रॉसिंगमुळे आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. काही तर परीक्षेपासून वंचित राहिले. काहींचे करिअर तर जीवावरही बेतले. विशेष म्हणजे, या क्रॉसिंगवरील वाहतुकीची कोंडी दूर करणे शक्य आहे, परंतु रेल्वे प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. या क्रॉसिंगचे वैशिष्ट्य म्हणजे, येथून एनटीपीसीच्या (कोराडी) प्रकल्पापर्यंत कोळसा पोहचविण्यासाठी रेल्वे मालगाड्यांची वाहतूक होते. पूर्वी येथून मोजक्याच रेल्वे गाड्या धावत होत्या, परंतु कोराडी येथे नवीन प्रकल्प सुरू झाल्याने आणि कोळशाच्या मागणीत वाढ झाल्याने मालगाड्यांची संख्या पाचवरून वीस झाली आहे.-प्रत्येक मालगाडीला हळू चालावे लागते आणि रेल्वे येण्याच्या काही वेळापूर्वी फाटक बंद केले जाते. -रेल्वे प्रशासनाकडून एनटीपीसीशिवाय इतर रेल्वे गाड्यांसाठीही हा मार्ग उपलब्ध करून देत असल्याने समस्या निर्माण झाली आहे. - जर ट्रेन कळमना स्टेशनवर तांत्रिक बिघाडामुळे थांबत असल्यास तर त्याचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग क्रॉसिंगवर असतो. यामुळे रेल्वे फाटक बंद ठेवल्या जाते. -या क्रॉसिंगच्या काही अंतरावर दुसरे क्रॉसिंग आहे. हे क्रॉसिंग मानवरहित आहे आणि येथूनही कोळशाच्या रेल्वेची वाहतूक होते. - या दोन्ही क्रॉसिंगच्या मध्ये एक १५ फुटाचा पूल आहे ज्याच्या खालून रेल्वे जाते.