शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
5
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
6
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
7
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
8
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
9
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
10
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
11
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
12
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
13
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
14
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
15
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
16
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
17
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
18
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
19
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
20
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल

IRCTC चे शानदार टूर पॅकेज! तिरुपती, कन्याकुमारीसह 'या' स्थळांना भेट देऊ शकता कमी बजेटमध्ये, 9 दिवसांचा दौरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 13:36 IST

IRCTC Tour Package : या पॅकेजद्वारे तुम्हाला तिरुपती, कन्याकुमारी, रामेश्वरम आणि मदुराईला भेट देण्याची संधी मिळेल.

नवी दिल्ली :  येत्या काही दिवसांत दक्षिण भारतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांना भेट देण्याचा तुमचा प्लॅन असेल, तर तुमच्यासाठी स्वस्तात फिरण्याची चांगली संधी आहे. दरम्यान, आयआरसीटीसीने (IRCTC) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Amrit Mahotsav) आणि 'देखो अपना देश' मोहिमेअंतर्गत स्वस्त टूर पॅकेज (IRCTC Tour Package 2023) आणले आहे.

या पॅकेजद्वारे तुम्हाला तिरुपती, कन्याकुमारी, रामेश्वरम आणि मदुराईला भेट देण्याची संधी मिळेल. टूर पॅकेजचा खर्च 13,900 रुपयांपासून सुरू होतो. यामधील सुविधाबद्दल बोलायचे तर टूर पॅकेजमध्ये खाण्या-पिण्याव्यतिरिक्त तुम्हाला फिरण्यासाठी बसही दिली जाईल.या टूर पॅकेजची सुरुवात 24 जानेवारी 2023 रोजी गुजरातमधील राजकोट येथून होईल. हा संपूर्ण प्रवास 8 रात्री 9 दिवसांचा असणार आहे. 

या पॅकेजमध्ये तुम्हाला खाण्यापिण्याची चिंता करण्याची गरज नाही. आयआरसीटीसी सर्व व्यवस्था करणार आहे. हा प्रवास स्वदेश दर्शन टुरिस्ट ट्रेनमधून होणार आहे. या विशेष ट्रेनमध्ये प्रवास करणारे प्रवासी राजकोट, साबरमती, वडोदरा, कल्याण आणि पुणे स्थानकांवरून बोर्डिंग/डिबोर्डिंग शकतील.

टूर पॅकेजसाठी शुल्क किती?इकॉनॉमी टूर पॅकेजसाठी दर बदलतील. पॅकेज 13,900 रुपये प्रति व्यक्तीपासून सुरू होईल. जर तुम्ही बजेट कॅटगरीमध्ये प्रवास करत असाल तर तुम्हाला 13,900 रुपये मोजावे लागतील. जर स्टँडर्ड कॅटगरी पॅकेज घेतल्यास प्रति व्यक्ती 15,300 रुपये शुल्क द्यावे लागेल. कंफर्ट कॅटगरीसाठी प्रति व्यक्ती 23800 रुपये द्यावे लागतील.

असे करु शकता बुकिंगया टूर पॅकेजसाठी आयआरसीटीसीच्या वेबसाइट irctctourism.com वर जाऊन ऑनलाइन बुकिंग करता येईल. याशिवाय, आयआरसीटीसी टुरिस्ट फॅसिलिटेशन सेंटर, झोनल ऑफिस आणि रिजनल ऑफिसमधूनही बुकिंग करता येईल.

या मिळतील सुविधासाउथ इंडिया डिवाइन एक्‍स राजकोट (South India Divine Ex. Rajkot (WZSD10)), असे या पॅकेजचे नाव आहे. या टूरमध्ये तुम्हाला तिरुपती, कन्याकुमारी, रामेश्वरम आणि मदुराई येथे नेले जाईल. 24 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात फक्त आयआरसीटीसी प्रवाशांना नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण देईल. प्रवासी स्लीपर आणि थर्ड एसीमध्ये प्रवास करू शकतात. प्रवासी राजकोट, साबरमती, वडोदरा, कल्याण आणि पुणे स्थानकांवरून त्यांचा प्रवास सुरू आणि संपवू शकतात.

टॅग्स :tirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाटIRCTCआयआरसीटीसीrailwayरेल्वेRameshwar mandir Achraरामेश्वर मंदिर आचऱा