IRCTC Tour Package : व्हॅलेंटाईन डेला गर्लफ्रेंडसोबत थायलंड फिरण्याची संधी, IRCTC ने आणले खास पॅकेज, जाणून घ्या बुकिंग डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 11:29 AM2024-01-23T11:29:50+5:302024-01-23T11:30:49+5:30

IRCTC Tour Package : या पॅकेजअंतर्गत तुम्हाला थायलंडमध्ये ३ रात्री आणि ४ दिवस फिरण्याची संधी मिळेल.

irctc thailand tour package visit pattaya bangkok valentine's special with girlfriend or wife know booking detail | IRCTC Tour Package : व्हॅलेंटाईन डेला गर्लफ्रेंडसोबत थायलंड फिरण्याची संधी, IRCTC ने आणले खास पॅकेज, जाणून घ्या बुकिंग डिटेल्स

IRCTC Tour Package : व्हॅलेंटाईन डेला गर्लफ्रेंडसोबत थायलंड फिरण्याची संधी, IRCTC ने आणले खास पॅकेज, जाणून घ्या बुकिंग डिटेल्स

नवी दिल्ली : 'व्हॅलेंटाईन डे' (Valentine Day) ला प्रेमाचा दिवस म्हणतात. यामुळे १४ फेब्रुवारीला जगभरात व्हॅलेंटाईन डे मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुम्हीही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी प्रवास करण्याचा विचार करत असाल तर आयआरसीटीसी (IRCTC) तुमच्यासाठी एक शानदार हवाई टूर पॅकेज घेऊन आले आहे. या पॅकेजअंतर्गत तुम्हाला थायलंडमध्ये ३ रात्री आणि ४ दिवस फिरण्याची संधी मिळेल.

या पॅकेजमध्ये तुम्हाला पटाया आणि बँकॉक फिरण्याची संधी मिळणार आहे. हे पॅकेज टूर १४ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या संपूर्ण पॅकेजसाठी तुम्हाला जवळपास ४८,४७० रुपये खर्च करावे लागतील. या पॅकेजमध्ये तुम्हाला हॉटेलमध्ये राहणे, फ्लाइट तिकीट, जेवण इत्यादी अनेक सुविधा मिळतील. तसेच, हे पॅकेज हैदराबादपासून सुरू होणार आहे.

टूर पॅकेजसंदर्भात थोडक्यात माहिती....
पॅकेजचे नाव - Treasures Of Thailand, Valentine’s Day Special Ex Hyderabad (SHO12)
डेस्टिनेशन - पटाया आणि बँकॉक
टूरची तारीख- १४ फेब्रुवारी २०१४
टूरचा कालावधी- ४ दिवस/३ रात्री
जेवण - नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण
ट्रॅव्हलिंग मोड - फ्लाइट
विमानतळ/निघण्याची वेळ- हैदराबाद विमानतळ/00:45 AM

टूर पॅकेजसाठी किती असेल खर्च?
जर तुम्ही या ट्रिपला एकटे जात असाल तर तुम्हाला त्यासाठी ५६,८४५ रुपये खर्च करावे लागतील. तर दोन लोकांसाठी प्रति व्यक्ती खर्च ४८,४७० रुपये आहे. याशिवाय तुम्ही तीन लोकांसोबत प्रवास केल्यास तुम्हाला प्रति व्यक्ती केवळ ४८,४७० रुपये खर्च करावे लागतील. या पॅकेजमध्ये मुलांसाठी बेडसह ४६,५७५ रुपये आणि बेडशिवाय ४१,५५० रुपये खर्च येईल.
 

Web Title: irctc thailand tour package visit pattaya bangkok valentine's special with girlfriend or wife know booking detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.