शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

३३ हजारात काश्मीरची सहल, आयआरसीटीसीने लॉन्च केलं १२ दिवसांचं पॅकेज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 15:09 IST

भारतीय रेल्वेकडून एक १२ दिवसांचं खास पॅकेज लॉन्च करण्यात आलंय. या पॅकेजचं सुरुवातीचं भाडं ३३ हजार रुपये आहे. 

नवी दिल्ली : जर तुम्ही काश्मीरला फिरायला जाण्याचा विचार करताय आणि तुम्हाला ही ट्रिप कमी बजेटमध्ये करायची असेल तर एक चांगली संधी आहे. भारतीय रेल्वेकडून एक १२ दिवसांचं खास पॅकेज लॉन्च करण्यात आलंय. या पॅकेजचं सुरुवातीचं भाडं ३३ हजार रुपये आहे. 

या पॅकेजमध्ये भारतीय रेल्वे तुम्हाला पंजाब आणि जम्मू-काश्मीरसहीत अनेक शहरांचा प्रवास करवणार. या शहरांच्या यादीत जालंधर, अमृतसर, श्रीनगर, कटरा, गुलमर्ग आणि सोनमर्ग यांचा समावेश आहे. प्रवाशांना एकीकडून रेल्वेने आणि दिल्लीहून विमानाने प्रवास करण्याची संधीही मिळेल. 

आयआरसीटीसीनुसार, या पॅकेजसाठी प्रवाशांना त्यांचा प्रवास चेन्नई किंवा विजयवाडा येथून सुरु करावा लागेल. १४ सप्टेंबरला एक स्पेशल रेल्वे कुचुवेली येथून सुटेल आणि २५ सप्टेंबरला दिल्लीला पोहोचेल, १५ सप्टेंबरला ही रेल्वे विजयवाडा पोहोचेल आणि १७ तारखेला सायंकाळी ६ वाजता जालंधरला पोहोचेल. 

१८ सप्टेंबरला सर्व प्रवाशांना रस्त्यामार्गे अमृतसरला जावं लागेल. इथे पूर्ण दिवस सुवर्ण मंदिर, जालियनवाला बाग, वाघा बॉर्डर फिरवले जाईल. येथून पुन्हा जालंधरला आणलं जाईल. रात्रभर कटरासाठी प्रवास करावा लागेल. कटरा मार्गे रस्त्यामार्गे श्रीनगरला नेले जाईल. २० सप्टेंबर ते २३ सप्टेंबरपर्यंत प्रवाशांना काश्मीर घाटीमध्ये फिरण्याची संधी मिळेल. यात एक दिवस श्रीनगर, सोनमार्ग आणि गुलमार्ग यांचा समावेश असेल. २३ तारखेला प्रवाशी निशात बाग आणि शालीमारला फिरू शकतील.

२४ तारखेला प्रवाशांना पुन्हा दिल्लीला आणले जाईल. येथून त्यांना विमानाने चेन्नई, कोच्ची आणि विजयवाडा येथे सोडले जाईल. प्रत्येक प्रवाशाला या पॅकेजसाठी कमीत कमी ३३ हजार ३०० रुपये आणि जास्तीत जास्त ५२ हजार ७५० रुपये द्यावे लागतील. 

टॅग्स :Travelप्रवासJammu Kashmirजम्मू-काश्मीरIRCTCआयआरसीटीसीIndian Railwayभारतीय रेल्वे