सूर्य आता अधिकच आग ओकायला लागला आहे. त्यामुळे घामाने आणि चकटा देणाऱ्या उन्हामुळे लोक हैराण होत आहेत. अशात एखाद्या थंड ठिकाणांवर फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर प्रश्नात पडला असाल की कुठे जायचं? कारण आपल्यासमोर कितीतरी ऑप्शन असतात. अशावेळी यातील एक निवडणं कठिण काम ठरतं. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी एक चांगला पर्याय घेऊन आलो आहोत
तुम्हीही कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर केरळच्या तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील कोवलमला जाऊ शकता. कोवलम हे ठिकाण तेथील सुंदर बीच आणि ताडासाठी लोकप्रिय आहे. कोवलमच्या बीच जगभरात प्रसिद्ध आहे. जगभरातील पर्यटकांना येथील समुद्र लाटा आकर्षित करतात. त्यासोबतच इथे तुम्ही वॉटर स्पोर्ट्सचाही आनंद घेऊ शकता.
कुठे फिराल?
1) शंकुमुघम बीच
शंकुमुघम बीचवरील सायंकाळ फार सुंदर आणि देखणी असते. इथे सूर्यास्त बघण्यासाठी दूरदूरुन लोक येतात. येथील सूर्योदय आणि सूर्यास्त आयुष्यभरासाठी तुमच्या आठवणीत राहू शकतो.
२) लाइटहाऊस बीच
कोवलममध्ये लाइटहाऊस नावाचा एक बीच आहे. लाइटहाऊस बीच हा अरबी समुद्राच्या तटावर आहे. येथून तुम्ही कोवलमच्या सुंदर गावांचा सुंदर नजारा बघू शकता.
३) वरकल बीच
शंकुमुघम बीच आणि लाइटहाऊस बीचसोबतच इथे वरकल बीचही बघण्यासारखा आहे. येथील टेकड्यांवरुन तुम्ही अरबी समुद्राच्या खवळलेल्या लाटांचं विहंगम दृश्य बघू शकता.
४) वेली लगून
वेली लगून हे येथील लोकप्रिय वॉटर पार्क आहे. इथे तुम्ही वेगवेगळ्या वॉटर स्पोर्ट्सने एन्जॉय करु शकता. वेली लगून वॉटर पार्कसोबतच इथे एक मोठं अभयारण्यही आहे. येथील जंगलात तुम्ही हत्तीसोबत वेगवेगळी प्राणी बघू शकता.
५) पद्मनाभस्वामी महल
कोवलमला गेल्यावर पद्मनाभस्वामी महल बघायला विसरु नका. वेली डोंगरांच्या मधोमध असलेल्या या महलावरील लाकडाच्या कलाकृती उत्तम आहेत. या महलाच्या भितींवर प्राचीन चित्रकला बघू शकता. त्यासोबतच पद्मनाभस्वामी मंदिरातही जाऊ शकता.