गुगलचा अभ्यास म्हणतोय की पर्यटकांच्या आवडीत गोवा आहे नंबर 1 ! फिरण्यासाठी होतोय स्मार्ट फोनचा वापर!
By Admin | Updated: May 29, 2017 19:00 IST2017-05-29T18:56:35+5:302017-05-29T19:00:11+5:30
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या गुगल इंडिया रिपोर्टनुसार गोवा हे भारतातलं पर्यटकांचं सर्वाधिक पसंतीचं टूरिस्ट डेस्टिनेशन ठरलं आहे.

गुगलचा अभ्यास म्हणतोय की पर्यटकांच्या आवडीत गोवा आहे नंबर 1 ! फिरण्यासाठी होतोय स्मार्ट फोनचा वापर!
- अमृता कदम
एकापेक्षा एक सुंदर बीचेस, चर्च आणि मंदिरं, सी-फूडचे नानाविध प्रकार, पब आणि क्लब...मौजमजा करायची असो की थोडासा निवांतपणा हवा असो गोवा बेस्ट आॅप्शन आहे. हे आम्ही नाही सांगत तर नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या गुगल इंडिया रिपोर्टनुसार गोवा हे भारतातलं पर्यटकांचं सर्वाधिक पसंतीचं टूरिस्ट डेस्टिनेशन ठरलं आहे.
फिरण्याच्या बाबतीत आपण नेहमीच परदेशी प्रवाशांकडे खूप कौतुकानं पाहतो. पण आता प्रवासाबद्दलचा भारतीयांचा उत्साह आणि उत्सुकताही वाढत असल्याचं या अहवालाच्या निमित्तानं स्पष्ट झालंय!