जोडीदारासोबत रोमॅन्टिक ठिकाणी जायच मग या पाच जागा आहेत ना !

By Admin | Updated: May 5, 2017 13:02 IST2017-05-04T18:16:59+5:302017-05-05T13:02:00+5:30

तुमच्या जोडीदारासोबत रोमॅण्टिक सफरीसाठी काहीतरी नाविन्यपूर्ण करायचा विचार तुम्ही करत असाल तर फार लांब जायची गरज नाही. भारतातहीअशा रोमॅन्टिक जागा खूप आहेत,एकदा शोधून तर पाहा.

Going to romantic places with the partner, these five places are there! | जोडीदारासोबत रोमॅन्टिक ठिकाणी जायच मग या पाच जागा आहेत ना !

जोडीदारासोबत रोमॅन्टिक ठिकाणी जायच मग या पाच जागा आहेत ना !


-अमृता कदम

तेच तेच समुद्रकिनारे, हिलस्टेशन्स, तिथल्या हॉटेल्समधे आयोजित केले जाणारे घाऊक कँडल लाईट डिनर याचा तुम्हाला कंटाळा आला असेल, तुमच्या जोडीदारासोबत रोमॅण्टिक सफरीसाठी काहीतरी नाविन्यपूर्ण करायचा विचार तुम्ही करत असाल तर फार लांब जायची गरज नाही. भारतातही नितांत सुंदर पण काहीशी अपरिचित अशी ठिकाणं आहेत जी तुमच्या रोमॅण्टिक ट्रीपला अविस्मरणीय करून टाकतील.

हिमालयाच्या कुशीतलं ‘मशोबरा’
शिमल्यापासून अवघ्या अधर््या तासाच्या अंतरावर मशोबरा नावाचा एक छोटा स्वर्गच वसलाय. ओक आणि पाईनच्या घनदाट वृक्षराजीत वसलेला हा परिसर. जोडीदाराच्या हातात हात गुंफून लॉंग वॉक करण्यासाठी एकदम योग्य जागा. सफरचंदांच्या बागांना भेट द्या किंवा दुपारी जंगली स्ट्रॉबेरी हातानं तोडून खाण्याचा आनंद लुटा. ज्यांना सगळं काही विसरु न निसर्गाच्या सान्निध्यात राहायला आवडतं त्यांच्यासाठी हिमालायच्या कुशीत वसलेलं मशोबरा अवर्णनीय आनंद देणारं आहे.

 

Web Title: Going to romantic places with the partner, these five places are there!