एकट्यानं फिरायला जाताय, खुशाल जा! फक्त या 6 गोष्टी बरोबर न्यायला विसरू नका! या गोष्टी प्रवासात घेतात तुमची काळजी!
By Admin | Updated: May 31, 2017 18:13 IST2017-05-31T18:11:49+5:302017-05-31T18:13:08+5:30
एकट्यानं फिरायला अवश्य जा पण प्रवासात स्वत:ला जपण्यासाठी काही बेसिक गोष्टी तुमच्या सामानात ठेवाच!

एकट्यानं फिरायला जाताय, खुशाल जा! फक्त या 6 गोष्टी बरोबर न्यायला विसरू नका! या गोष्टी प्रवासात घेतात तुमची काळजी!
- अमृता कदम
आजकाल एकट्यानंच फिरायला निघणाऱ्या हौशी भटक्यांची संख्या वाढत आहे. आपली सवड पाहून स्वत:सोबत थोडा निवांत वेळ घालवता यावा, नव्या अनुभवांना कोणत्याही बंधनांशिवाय सामोरं जाता यावं म्हणून एकट्यानंच बाहेर पडण्याला पसंती दिली जाते. पण एकट्यानं फिरण्यातल्या थ्रीलची हौस भागवतानाच स्वत:च्या सुरक्षेचाही विचार करणं गरजेचं आहे. प्रवासात आपली काही गैरसोय होणार नाही याकडे लक्ष देणंही तितकंच गरजेचं आहे. म्हणूनच प्रवासात स्वत:ला जपण्यासाठी काही बेसिक गोष्टी तुमच्या सामानात असणं आवश्यकच आहे.
6. लगेज मॉनिटर
प्रवासात तुमचं सामान हरवू नये यासाठी लगेज ट्रॅकर अत्यंत उपयुक्त आहे. कारण एकट्यानं प्रवास करताना तुम्हाला वस्तूंची आठवण करून द्यायला सोबत कोणी नसतं. या मॉनिटरमुळे तुम्ही मोबाईल फोनच्या माध्यमातून तुमच्या सामानाचा मागही ठेवू शकता आणि तुम्हाला तुमच्या लगेजसंबंधातले अपडेटही मिळत राहतात.
तर मग यापुढे एकट्यानंच ट्रीप प्लॅन करताना सामानामध्ये या सहा महत्त्वाच्या गोष्टी आवर्जून ठेवा. कारण सुरक्षित आणि आरामदायी प्रवासच तुम्हाला फिरण्याचा खराखुरा आनंद देऊ शकतो.