परदेशी सहल बजेटमध्ये बसू शकते !
By Admin | Updated: April 26, 2017 17:51 IST2017-04-26T17:51:10+5:302017-04-26T17:51:10+5:30
आशिया खंडातच अशी ठिकाणं आहेत जी नितांत सुंदर आहेत, सहज बजेटमध्ये बसणारी आहेत आणि जी ‘फिरायला परदेशात जावून आलो’ याचा आनंद देणारीही आहेत.

परदेशी सहल बजेटमध्ये बसू शकते !
-अमृता कदम
परदेशप्रवास ही काही अपूर्वाईची गोष्ट राहिलेली नसली तरी अनेकांसाठी आजही परदेश प्रवास हे स्वप्न असतं. खर्चाचा विचार करून अनेकजण परदेशी फिरायला जाण्याचे बेत पुढे ढकलत राहतात. पण आता तुम्ही परदेशी जाण्याची तयारी खिशाचा विचार न करताही करु शकता. त्यासाठी आशिया खंडातच अशी ठिकाणं आहेत जी नितांत सुंदर आहेत, सहज बजेटमध्ये बसणारी आहेत आणि जी ‘फिरायला परदेशात जावून आलो’ याचा आनंद देणारीही आहेत.
* थायलंड
भारतापासून जवळचं परदेशी ठिकाण. परफेक्ट हनीमून डेस्टिनेशन. सूर्यकिरणांनी न्हाऊन निघणारे सोनेरी समुद्रकिनारे, सुंदर बौद्ध मंदिरे, महाल अशी ही स्वस्त आणि एकदम मस्त ठिकाणं. शिवाय थाय फूडचं आकर्षणही आहेच! थायलंडचा विमान प्रवास आणि तिथे राहण्याचा खर्चही परवडण्याजोगा आहे. थायलंडमधली मोजकी ठिकाणं बघण्याचं नियोजन केल्यास आठवड्याभराची मस्त ट्रीप नक्कीच होऊ शकते.