शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

Dussehra 2018 : 'या' शहरात तब्बल ७५ दिवस साजरा केला जातो दसरा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2018 12:38 IST

दसरा देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे. असे मानले जाते की, लंकेत ९ दिवसांच्या युद्धात दसऱ्याच्या दिवशी म्हणजे विजयादशमीच्या दिवशी भगवान राम यांनी लंकापति रावणाचा वध केला होता.

दसरा देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे. असे मानले जाते की, लंकेत ९ दिवसांच्या युद्धात दसऱ्याच्या दिवशी म्हणजे विजयादशमीच्या दिवशी भगवान राम यांनी लंकापति रावणाचा वध केला होता. याचाच आनंद दरवर्षी या दिवशी साजरा केला जातो. देशभरात दसरा एक दिवस साजरा केला जातो. पण देशात एक असही शहर आहे जिथे दसरा ७५ दिवसांपर्यंत साजरा केला जातो. महत्त्वाची बाब म्हणजे दसऱ्याचा दिवस इथे भगवान राम आणि रामायणाला समर्पित नाही तर देवी दंतेश्वरीसाठी साजरा केला जातो. चला जाणून घेऊ या अनोख्या दसऱ्याबाबत....

बस्तर नावाने दसरा प्रसिद्ध 

छत्तीसगढच्या बस्तर परिसरातील दसरा चांगलाच प्रसिद्ध आहे. ७५ दिवस चालणारा हा दसरा बस्तर दसरा म्हणून ओळखला जातो. मान्यता आहे की, भगवान रामाने त्यांच्या वनवासातील बराच काळ दंडकारण्यमध्ये घालवला होता. हा भाग बस्तरचा प्राचीन भाग आहे.

देवी दंतेश्वरीची पूजा

रामाने रावणाचा वध केला म्हणून या शहरात दसरा साजरा होत नाही तर इथे देवी दंतेश्वरीची पूजा केली जाते. दसऱ्याच्या दिवशी इथे विशेष पूजेचं आयोजन केलं जातं. तसेच भव्य रथ यात्राही काढली जाते. देवी दंतेश्वरीला समर्पित या दसऱ्याची तयारी आणि उत्सव ७५ दिवसांआधी सुरु होते. 

जनतेच्या समस्या ऐकल्या जातात

७५ दिवस चालणारा हा उत्सव दसऱ्यानंतरही सुरु असतो आणि मुरिया दरबार प्रथा संपल्यावर या उत्सवाची सांगता होते. या रिवाजात बस्तरचे महाराज आपला दरबार लावतात आणि नागरिकांच्या समस्या ऐकून घेतात. तसेच त्यावर तोडगाही काढतात. 

रथ तयार करण्याची ६०० वर्ष जुनी प्रथा

रथ तयार करण्याचं काम केवळ संवरा जमातीचे लोक करतात. पण आधुनिक भारतात ही जमात जवळपास विलुप्त झाली आहे. त्यामुळे दुसऱ्या जमातीच्या लोकांना आपली जात बदलून रथ तयार करावा लागतो. तेव्हाच ते रथ तयार करु शकतात.  

टॅग्स :DasaraदसराJara hatkeजरा हटकेChhattisgarhछत्तीसगड